Join us

पंड्याची खेळी शानदार, भारताचे सामन्यातील आव्हान कायम

केपटाऊनमध्ये हार्दिक पंड्याने आक्रमक खेळी करीत भारताचे सामन्यातील आव्हान कायम राखले. कपिलदेव भारताचे महान ‘मॅचविनर’ खेळाडू यांचा आज वाढदिवस. पंड्याकडेही भविष्यातील कपिलदेव म्हणून बघण्यात येत आहे, पण पंड्याला मात्र त्याच्या स्वत:च्या नावाने ओळख मिळवायची आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 03:13 IST

Open in App

- सुनील गावस्कर लिहितात...केपटाऊनमध्ये हार्दिक पंड्याने आक्रमक खेळी करीत भारताचे सामन्यातील आव्हान कायम राखले. कपिलदेव भारताचे महान ‘मॅचविनर’ खेळाडू यांचा आज वाढदिवस. पंड्याकडेही भविष्यातील कपिलदेव म्हणून बघण्यात येत आहे, पण पंड्याला मात्र त्याच्या स्वत:च्या नावाने ओळख मिळवायची आहे. कपिलदेव यांनी केलेल्या कामगिरीच्या तुलनेत पंड्याने अर्धी मजल जरी मारली तरी भारतीय संघ कपिलप्रमाणे अनेक सामने जिंकू शकतो.कपिल देशाचा महान मॅचविनर खेळाडू होता. कारण त्याने गोलंदाजी व फलंदाजीच्या जोरावर संघाला अनेकदा विजय मिळवून दिला आहे. पंड्या सध्या शिकत आहे. त्याची वाटचाल बघता लवकरच तोसुद्धा तशीच कामगिरी करेल, असे वाटते.उजव्या यष्टिबाहेरच्या माºयावर भारतीय फलंदाजांनी स्वत:च्या विकेट बहाल केल्या. पहिल्या दिवसअखेर तीन विकेट गमावणे सेटबॅक होता. विजयने उजव्या यष्टिबाहेरचे अनेक चेंडू सोडताना जम बसविण्याचा प्रयत्न केला, पण फार बाहेर असलेले चेंडू खेळण्याच्या मोहात पडलेल्या विजयला त्याचे मोल द्यावे लागले. धवनचा आखूड टप्प्याच्या माºयावर पूलचा फटका मारण्याचा प्रयत्न फसला. ज्या फटक्यावर आपली हुकूमत नाही तो फटका खेळण्याचा मोह आवरायला हवा. एकदा जम बसला म्हणजे सर्व प्रकारचे फटके खेळता येतात. कोहली चांगल्या चेंडूवर बाद झाला असला तरी तो चेंडू सोडता आला असता, याची त्यालाही कल्पना आली असेल.उपाहारानंतर पुजाराच्या संयमाचा बांध फुटला आणि तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. आश्विनने तेच केले. फ्रंटफूटची हालचाल न करण्याची चूक रोहितला नडली. पंड्या व भुवनेश्वर यांनी डाव सावरला. पंड्याची खेळी शानदार होती. भुवनेश्वरचीही प्रशंसा करायला हवी.या भागीदारीमुळे भारताला सामन्यात आव्हान कायम राखता आले. महाराज यालाहीगोलंदाजीची संधी मिळाली. चेंडू वळत असल्यामुळे येथे चौथ्या डावात फलंदाजी करणे सोपे राहणार नाही. पंड्या व भुवनेश्वर यांनी या खेळपट्टीवर फलंदाजी कशी करायची, हे संघातील फलंदाजांना दाखवून दिले.

(पीएमजी)

टॅग्स :क्रिकेट