Join us  

पाकिस्तानच्या गोलंदाजाने मोडला 82 वर्षांपूर्वीचा विक्रम

पाकिस्तानचा फिरकीपटू यासिर शाहने गुरुवारी 82 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2018 6:31 PM

Open in App

अबुधाबी, पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड : पाकिस्तानचा फिरकीपटू यासिर शाहने गुरुवारी 82 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. त्याने क्रिकेट इतिहासात सर्वात जलद 200 विकेट घेण्याचा मान पटकावला. न्यूझीलंडचा रॉस टेलर हा त्याचा 200वा बळी ठरला. हा विक्रम यापूर्वी क्लॅरी ग्रिमेट यांच्या नावावर होता. त्यांनी 36 कसोटींत 200 विकेट घेण्याचा पराक्रम केला होता आणि यासिरने ही कामगिरी 33व्या कसोटीत केली. 

या सामन्याआधी यासिरच्या नावावर 32 कसोटीत 195 विकेट्स होत्या. त्याने न्यूझीलंडच्या पहिल्या डावात 3 विकेट घेतल्या होत्या आणि दुसऱ्या डावात 2 विकेट घेत त्याने विकेट्सचे द्विशतक पूर्ण केले. 1936 साली ऑस्ट्रेलियाच्या ग्रिमेट यांनी आपल्या 36 व्या सामन्यात 200 वा बळी घेतला होता. या कामगिरीमुळे यासिर सध्या कसोटी क्रिकेटमधला सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक म्हणून गणला जातो आहे. यासिर व्यतिरीक्त रविचंद्रन आश्विनने 37, डेनिल लिलीने 38 आणि वकार युनूसने 38 आणि डेल स्टेनने 39 व्या सामन्यांमध्ये 200 बळींचा टप्पा पूर्ण केला होता.  

टॅग्स :पाकिस्तानन्यूझीलंड