Join us  

OMG: पाकिस्तानात निगेटिव्ह अन् इंग्लंडमध्ये आढळला पॉझिटिव्ह; अन्य खेळाडूंवर कोरोना संकट!

इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान संघासाठी हा दौरा रोज नवीन संकट घेऊन येणारा ठरत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 3:27 PM

Open in App

इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान संघासाठी हा दौरा रोज नवीन संकट घेऊन येणारा ठरत आहे. या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट मंडळानं ( पीसीबी) खेळाडूंची कोरोना टेस्ट केली. त्यातही अनेक वाद झाले. पीसीबीनं केलेल्या चाचणीत कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या मोहम्मद हाफिज खासजी चाचणीत निगेटिव्ह आढळला. त्यानं तो अहवाल सोशल मीडियावर अहवाल पोस्ट करून पीसीबीला तोंडघशी पडलं. त्यानंतर पुन्हा चाचणी करून खेळाडूंना इंग्लंड दौऱ्यावर नेण्यात आलं. पण, आत तिथे इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून चाचणी करण्यात आली आणि त्यात पाकिस्तानचा एक खेळाडू पॉ़झिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे अन्य खेळाडूंवर कोरोना संकट आलं आहे.

स्टार मॉडलला आवडतो भारतीय क्रिकेटपटू; व्यक्त केली लग्न करण्याची इच्छा!

पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू कशीफ भट्टी हा पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. 33 वर्षीय भट्टी हा लंडनमध्ये दुसऱ्या आठवड्यात तीन खेळाडूंसह दाखल झाला होता. क्रिकेट पाकिस्ताननं दिलेल्या वृत्तानुसार भट्टी आता सेल्फ आयसोलेशनमध्ये गेला आहे. पीसीबीला इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

पीसीबीनं केलेल्या पहिल्या कोरोना चाचणीत भट्टी पॉझिटिव्ह आढळला होता आणि त्यानंतर त्याची पुन्हा चाचणी केली त्यात तो अहवाल निगेटिव्ह झाला. त्याच्यासह हैदर अली आणि इम्रान खान हे इंग्लंडमध्ये दाखल झाले. पण, आता भट्टी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे आणि तो या मालिकेत खेळू शकणार नाही.  याबाबत दोन्ही क्रिकेट मंडळाकडून अधिकृत माहिती आलेली नाही. 

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात 5 ऑगस्टपासून मालिका सुरू होणार आहे. उभय संघांत तीन कसोटी व तीन ट्वेंटी-20 सामने होणार आहेत. तत्पूर्वी इंग्लंडचा संघ आयर्लंडविरुद्ध तीन वन डे सामने खेळणार आहे.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

 

गॅरी कर्स्टन यांच्यासाठी MS Dhoni नं घेतलेला आयोजकांशी पंगा अन्...

धक्कादायक; सौरव गांगुली होम क्वारंटाईन, कुटुंबातील आणखी एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह

स्विमर, वॉटर पोलो खेळाडू अन् वकील; जगातील स्फोटक फलंदाजाच्या पत्नीची चर्चा!

 इंग्लंडची मोठी कारवाई; नियम मोडणाऱ्या गोलंदाजाला केलं संघाबाहेर 

 

 

टॅग्स :पाकिस्तानइंग्लंड