Join us  

पाकिस्तानच्या कर्णधाराला बॉलिवूडचे वेध; या नायिकेसोबत काम करण्याची इच्छा

पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार सर्फराज अहमद सध्या सुट्टीवर आहे. नुकत्याच झालेल्या वन डे मालिकेत पाकिस्तानने यजमान झिम्बाब्वेवर ५-० असे निर्भेळ यश मिळवले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 10:00 AM

Open in App

मुंबई - पाकिस्तानक्रिकेट संघाचा कर्णधार सर्फराज अहमद सध्या सुट्टीवर आहे. नुकत्याच झालेल्या वन डे मालिकेत पाकिस्तानने यजमान झिम्बाब्वेवर ५-० असे निर्भेळ यश मिळवले होते. पाकिस्तानी खेळाडूंनी फलंदाजी व गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर अप्रतिम कामगिरी केली होती. सर्फराजने नुकत्याच एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याचे बॉलिवूड प्रेम जाहीर केले आणि त्याने सलमान खानसारखी 'दबंग' भूमिका साकारायला आवडेल असेही सांगितले. 

सर्फराजचे हे बॉलिवूडप्रेम येथेच थांबले नाही, त्याने लगेचच  नायिकेचीही घोषणा करून टाकली. ३१ वर्षीय सर्फराजने जीओ टिव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की,"मला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली, तर मला सलमान खानसारखी दबंग भूमिका साकारायला आवडेल. " त्याने चित्रटात नायिका म्हणून कॅटरीना कैफची निवड केली. सलमान आणि कॅटरीना ही बॉलिवूडमधील  आवडती जोडी असल्याचे त्याने सांगितले. 

झिम्बाब्वे दौऱ्यात सर्फराजला फलंदाजीची फार संधी मिळाली नाही, परंतु त्याने यष्टिमागे सुरेख कामगिरी केली. त्याने सात झेल टीपले. त्याच्याच नेतृत्वाखाली पाकिस्तानने गतवर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. सर्फराजने ४१ कसोटी, ९० वन डे आणि ४८ टी ट्वेंटी सामने खेळले आहेत. 

 

टॅग्स :क्रिकेटपाकिस्तानक्रीडा