Join us  

पाकिस्तानच्या अलिश्बाने जाहीर केले मोहम्मद शामीबरोबरचे संबंध

अलिश्बाकडून शामी पैसे घेत असून देशाची फसवणूक करत आहे, असे आरोपही हसीनने केले होते. पण आता अलिश्बाने या प्रकरणाबाबत वक्तव्य केले आहे. त्याचबरोबर आपले शामीबरोबर कसे संबंध आहेत, हेदेखील अलिश्बाने जाहीर केले आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2018 5:37 PM

Open in App
ठळक मुद्दे भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीच्या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळण्याची शक्यता आहे

कराची : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीच्या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळण्याची शक्यता आहे. कारण शामीची पत्नी हसीन जहाँने त्याचे पाकिस्तानमधील अलिश्बा या मुलीशी अनैतिक संबंध असल्याचे म्हटले होते. अलिश्बाकडून शामी पैसे घेत असून देशाची फसवणूक करत आहे, असे आरोपही हसीनने केले होते. पण आता अलिश्बाने या प्रकरणाबाबत वक्तव्य केले आहे. त्याचबरोबर आपले शामीबरोबर कसे संबंध आहेत, हेदेखील अलिश्बाने जाहीर केले आहे. 

 शामीची पत्नी हसीन जहाँ हिने शमीचे फेसबुक मेसेंजर आणि व्हॉट्सअॅपवरील चॅटिंगचे स्क्रीनशॉट शेअर करून त्याच्यावर हे आरोप केले आहेत.  दरम्यान या प्रकारामुळे शामीचे वैवाहिक जीवन धोक्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये सोशल मीडियावर शामीचे काही तरुणींसोबतचे फोटो  पोस्ट करण्यात आले आहेत. त्या तरुणी शामीच्या गर्लफ्रेंड असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच त्यांच्यासोबतच्या अश्लील चॅटिंगचे स्क्रीनशॉटही शेअर करण्यात आले आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानमधील प्रेयसीकडून शामी पैसे घेतो आणि देशाला धोका देत आहे, असेही हसीनने सांगितले होते.

आपल्या शामीबरोबरच्या संबंधांबद्दल अलिश्बा म्हणाली की, " मी शामीची चाहती आहे. इंस्टाग्रॅमवर मी त्याला फॉलोदेखील करते. मी शामीला दुबईमध्ये भेटली होती. ही गोष्ट खरी आहे. पण मी त्याला एक चाहती म्हणूनच  भेटली होती. मला शामीला भेटण्याची इच्छा होती. पण आम्ही कुठल्याही हॉटेलमध्ये भेटलो नाही, तर शामीच्या बहिणीच्या घरीच भेटलो होतो. त्यामुळे शामीवर जे आरोप केले जात आहेत, बिनबुडाचे आहेत."

अलिश्बा पुढे म्हणाली की, " इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स करंडक सुरु असताना शामीवर काही टीका होत होती. त्यावेळी मी शामीला काही प्रश्न विचारले होते. शामीने काही काळानंतर त्या प्रश्नांवर उत्तरे दिली होती. त्यानंतर आमचा संवाद सुरु झाला. "

टॅग्स :मोहम्मद शामी