Join us  

पाकिस्तानचे क्रिकेटपटू आळशी; ट्रेनिंगला न जाता काढतात झोपा

सध्याच्या घडीला पाकिस्तानचे नवनिर्वाचित प्रशिक्षक मिसबाह उल हक हे संघातील खेळाडूंच्या वागण्यामुळे हैराण झालेले पाहायला मिळतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 7:42 PM

Open in App

कराची : पाकिस्तानचा संघ भारताशी तुलना करू पाहत असतो, पण या दोन्ही संघांमध्ये व्यावसायिकदृष्ट्या बराच मोठा फरक असल्याचे दिसत आहे. एकिकडे भारताने फिटनेस आणि ट्रेनिंगवर नेहमीच लक्ष दिले आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानचे क्रिकेटपटू ट्रेनिंगला जात नसून झोपा काढत असल्याचे पुढे आले आहे.

सध्याच्या घडीला पाकिस्तानचे नवनिर्वाचित प्रशिक्षक मिसबाह उल हक हे संघातील खेळाडूंच्या वागण्यामुळे हैराण झालेले पाहायला मिळतात. कारण पाकिस्तानला श्रीलंकेबरोबरच्या तीन ट्वेन्टी-20 सामन्यांच्या मालिकेत एकही सामना जिंकता आला नव्हता. त्यामुळे त्यांच्यावर दडपण वाढलेले आहे. पण दुसरीकडे मात्र खेळाडू मिसबाह यांचे काहीच ऐकत नसल्याचेही पुढे आले आहे.

एका सूत्राने सांगितले की, " मिसबाह यांना संघाचा स्तर वाढवायचा आहे. त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. पण संघातील वरिष्ठ खेळाडू त्यांचे काहीच ऐकत नसल्याचे समोर येत आहे. मिसबाह जेव्हा खेळाडूंना ट्रेनिंगसाठी बोलवतात तेव्हा ते काही तरी बहाणा बनवून झोपा काढतात. हीच गोष्ट मिसबाह यांना खटकत आहे."

 

पाकिस्तानमध्ये तब्बल तीन दिवस हॉटेलमध्ये बंदिस्त राहण्याची पाळी श्रीलंकेच्या संघावर आल्याचे वृत्त आहे. याबाबतचा खुलासा श्रीलंकेच्या सुरक्षेचे मुख्य अधिकारी शामी सिल्व्हा यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तीन दिवस श्रीलंकेच्या संघाचा हॉटेलमध्ये श्वास गुदमरला होता, अशा शब्दांत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

श्रीलंकेचा संघ पाकिस्तानमध्ये आतापर्यंत तीन एकदिवसीय आणि ट्वेन्टी-20 सामने खेळला आहे. या सामन्यांच्यावेळी पाकिस्तामध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था पाहायला मिळाली. सिल्व्हा हे पाकिस्तानमध्ये श्रीलंकेच्या संघबरोबर होते. पण काही दिवसांपूर्वी ते श्रीलंकेत परतले आणि त्यांनी ही गोष्ट आपल्या क्रिकेट मंडळाला सांगितली आहे.

पाकिस्तानमध्ये तीन दिवस हॉटेलमध्ये बंदिस्त होती श्रीलंकेची टीम

पाक मंडळाची श्रीलंकेकडे अजब मागणी, कसोटी मालिका खेळायचीय तर खर्च उचलाश्रीलंका क्रिकेट संघानं नुकतीच पाकिस्तानात ट्वेंटी-20 आणि वन डे मालिका खेळली. 2009मध्ये श्रीलंका संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय सामने झाले नव्हते. एक दोन सामने वगळता, पाकिस्तानात मोठा संघ येण्याची ही पहिलीच वेळ होती. ट्वेंटी-20 आणि वन डे मालिकेनंतर आता पाकिस्तान क्रिकेट मंडळ ( पीसीबी) श्रीलंकेसोबत कसोटी मालिका खेळवण्यास उत्सुक आहे. पाकिस्ताननं कसोटी मालिकेच्या आयोजनाची तयारी दर्शवली आहे. पण, त्याचवेळी श्रीलंकेला ही कसोटी मालिका संयुक्त अरब अमिराती येथे खेळायची असल्यास त्यांनी खर्च उचलावा, अशी अजब मागणी पीसीबीनं केली आहे.

संयुक्त अरब अमिरातीतील कसोटी मालिकेचा खर्च उचलण्यास पीसीबी तयार नाही. पीसीबीचे म्हणणे आहे की,''श्रीलंकेचा संघ कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर येण्यास उत्सुक नसेल आणि ही मालिका संयुक्त अरब अमिराती येथे व्हावी, अशी त्यांची इच्छा असेल, तर त्यांनी पीसीबीसोबत मिळून मालिकेचा खर्च उचलावा.'' 

टॅग्स :पाकिस्तानमिसबा-उल-हक