लाहोर: आशिया कप २०२५ मध्ये भारताकडून सलग तीन पराभवांचा सामना केल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) मोठी पावले उचलली आहेत. आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी घोषित करण्यात आलेल्या संघातून सॅम अयुबला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.
पाकिस्तानच्या क्रिकेट निवड समितीने सॅम अयुबला संघातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. आशिया कपमध्ये त्याने फलंदाजीत निराशाजनक कामगिरी केली होती, त्यामुळे त्याची कसोटी संघातील जागा धोक्यात होती. अखेर, निवड समितीने त्याला वगळले आहे. पाकिस्तानच्या संघात आता काही नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. टेस्ट सिरीजनंतर तीन वन डे आणि तीन टी-२० सामन्यांचाही समावेश आहे. पुढील चार-पाच दिवसांत सपाटून हरलेल्या आशिया कपमधील खेळाडूंना सरावासाठी पुन्हा एकत्र यायचे आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी घोषित झालेल्या संघात बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शान मसूद (कर्णधार) आणि शाहीन शाह आफ्रिदीसारख्या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. मात्र, आशिया कपमधील कामगिरीचे मूल्यमापन करून काही कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. या बदलांमागे संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी अधिक मजबूत करण्याचा उद्देश आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ:
शान मसूद (कर्णधार)
बाबर आझम
मोहम्मद रिझवान
आमिर जमाल
अब्दुल्ला शफीक
अबरार अहमद
आसिफ अफरीदी
हसन अली
इमाम-उल-हक
काम्रान गुलाम
खुर्रम शहजाद
नोमान अली
साजिद खान
सलमान अली आगा
सऊद शकील
शाहीन शाह अफरीदी