Join us  

कन्फ्युजन ही कन्फ्युजन! आफ्रिदीच्या नेमक्या कोणत्या मुलीसोबत शाहीनचं लग्न? जिला समजत होतो नवरी ती निघाली दुसरीच 

Shaheen Afridi Wedding: पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याची कन्या अंशा ( Ansha) यांचे शुक्रवारी लग्न झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2023 11:10 AM

Open in App

Shaheen Afridi Wedding: पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याची कन्या अंशा ( Ansha) यांचे शुक्रवारी लग्न झाले. शाहीन हा क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून  ओळखला जातो. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याच्या मुलीसोबत त्याचा काल विवाह झाला. पण, या विवाहाती फोटो पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. आतापर्यंत शाहिद आफ्रिदीच्या ज्या मुलीसोबत शाहीन लग्न करणार आहे, असे फोटो व्हायरल झाले होते ती नवरी म्हणून लग्नात उभी राहिलीच नाही. शाहीनची अंशा कुणीतरी दुसरीच निघाली.

शाहीन आफ्रिदीने ३ फेब्रुवारीला कराचीमध्ये अंशा आफ्रिदीसोबत लग्न केले. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमसह अनेक खेळाडू लग्नाला पोहोचले होते. शाहीन सध्या पाकिस्तानकडून खेळतो, तो संघाचा महत्त्वाचा गोलंदाज आहे. तो पाकिस्तानकडून २५ कसोटी, ३२ वन डे आणि ४७ ट्वेंटी-२० सामने खेळला आहे. यामध्ये त्याने अनुक्रमे ९९, ६२ आणि ६८ विकेट घेतल्या आहेत. या लग्न सोहळ्याला पाकिस्तान क्रिकेट संघातील अनेक खेळाडू उपस्थित होते.

  • शाहीन आफ्रिदी पत्नीचे नाव: अंशा आफ्रिदी
  • शाहीन आफ्रिदीचे वय किती आहे: २२
  • अंशा आफ्रिदीचे वय किती आहे: २३
  • शाहीन आफ्रिदीचे लग्न कधी झाले: ३ फेब्रुवारी २०२३

शाहीन आफ्रिदीची एकूण संपत्ती भारतीय रुपयांमध्ये सुमारे ५५ कोटी रुपये आहे. त्याची वार्षिक कमाई १२ कोटी रुपये आहे, तर त्याची मासिक कमाई ५० लाख ते एक कोटी रुपये आहे. २०२३ मध्ये शाहीन आफ्रिदीची एकूण संपत्ती $7 दशलक्ष आहे, जी भारतीय रुपयात अंदाजे ५५ कोटी रुपये आहे. शाहीन आफ्रिदी पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा येथील लेंडी कोटल येथे आपल्या कुटुंबासह आलिशान घरात राहतो. याशिवाय या गोलंदाजाची पाकिस्तानात आणखी बरीच घरे आहेत. शाहीन आफ्रिदीची ब्रँड एंडोर्समेंट फी १० ते २० लाख रुपये आहे.  त्याच्याकडे ऑडी A8 हायब्रिड    ( १.३ कोटी), टोयोटा रेवो हिलक्स ( ३५ लाख +), टोयोटा लँड क्रूझर    ( १.५ कोटी ) व होंडा सिविक ( २० लाख ) या गाड्या आहेत.    

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :शाहिद अफ्रिदीपाकिस्तान
Open in App