Join us

चुकीला माफी नाही!, कोरोनाचे नियम मोडल्यानं पाकिस्तानी खेळाडूला घरी हाकलले

न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेले पाकिस्तानी खेळाडू कोरोना नियमांचे काटेकोर पालन करत नसल्याचे CCTV फुटेज प्रसिद्ध करताना न्यूझीलंड सरकारनं त्यांना देशातून हद्दपार करण्याची वॉर्निंग दिली आहे.

By स्वदेश घाणेकर | Updated: December 1, 2020 09:46 IST

Open in App

पाकिस्तानी क्रिकेटपटू सध्या चुकीच्या कारणामुळे चर्चेत आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेले पाकिस्तानी खेळाडू कोरोना नियमांचे काटेकोर पालन करत नसल्याचे CCTV फुटेज प्रसिद्ध करताना न्यूझीलंड सरकारनं त्यांना देशातून हद्दपार करण्याची वॉर्निंग दिली आहे. त्यात त्यांच्या ७ खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. पाकिस्तानी खेळाडूंच्या या वर्तनावर माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर यानंही टीका केली. हे कमी की काय पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझम याच्यावर लाहोर येथील एका महिलेनं लैंगिग शोषणाचा आरोप केला. 

आता पाकिस्तानचा २८ वर्षीय फिरकीपटू रझा हसन हा चर्चेत आला आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे हसनची चर्चा आहे आणि त्याला थेट घरी हाकलण्यात आले आहे. पाकिस्तानच्या स्थानिक क्रिकेट स्पर्धा क्वैद-ए-आझम चषकमध्ये हसन नॉर्दर्न्स सेकंड XI संघाचे प्रतिनिधित्व करतो. त्याला आता घरी पाठवण्यात आले असून उर्वरित सामने खेळता येणार नसल्याचे, पाकिस्तान क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले. हसननं वैद्यकिय टीम आणि हाय परफॉर्मन्स विभागाच्या परवानगीशिवाय बायो-सुरक्षा बबल मोडले.

''वारंवार सूचना करूनही खेळाडूंनी नियम मोडणे, अत्यंत दुर्दैवी आहे. कोरोना नियमाचे काटेकोर पालन करणे, हे महत्त्वाचे आहे. हसननं ते नियम मोडले आणि शिस्तभंग केले,''असे पीसीबीचे हाय परफॉर्मन्स डायरेक्टर नदीम खान यांनी सांगितले. त्याला स्पर्धेतून हाकलण्यात आले आहे. २०१२च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत हसननं ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेल व शेन वॉटसन यांची विकेट घेतली होती. त्यानं १० ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत. २०१५मध्ये प्रतिबंधीत द्रव्य सेवन केल्याप्रकरणी तो दोषी आढळला होता आणि त्याच्यावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई झाली होती.  

टॅग्स :पाकिस्तानकोरोना वायरस बातम्या