वॉटसनचा सर्वाधिक 'भाव'! महिन्याला कोट्यवधींचा पगार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डही तयार

shane watson pakistan coach: पाकिस्तान क्रिकेट बोर्ड राष्ट्रीय संघासाठी परदेशी प्रशिक्षकांच्या शोधात आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 07:13 PM2024-03-15T19:13:19+5:302024-03-15T19:17:26+5:30

whatsapp join usJoin us
Pakistan Cricket Board is ready to pay former Australian player Shane Watson around Rs 4.6 crore per month for the post of head coach  | वॉटसनचा सर्वाधिक 'भाव'! महिन्याला कोट्यवधींचा पगार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डही तयार

वॉटसनचा सर्वाधिक 'भाव'! महिन्याला कोट्यवधींचा पगार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डही तयार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Pakistan Cricket Board: पाकिस्तान क्रिकेट बोर्ड राष्ट्रीय संघासाठी परदेशी प्रशिक्षकांच्या शोधात आहे. माजी खेळाडू मोहम्मद हफिजची हकालपट्टी झाल्यापासून ही जागा रिक्त आहे. आगामी काळात ट्वेंटी-२० विश्वचषक होणार आहे, या पार्श्वभूमीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड मुख्य प्रशिक्षक पदासाठी शेन वॉटसनशी संपर्क साधत आहे. या पदासाठी पीसीबीने ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूला कोट्यवधी रूपयांचे मानधन देणार असल्याचे मान्य केले. 

क्रिकेट पाकिस्तानने दिलेल्या माहितीनुसार, तगडे मानधन दिल्यामुळे वॉटसन प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी तयार झाला आहे. सुरुवातीला कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे त्याने नकार दर्शवला होता. पण भरीव मोबदला निश्चित झाल्यानंतर त्याने निर्णय बदलला. खरं तर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड वॉटसनला दरमहा सुमारे ४.६ कोटी रूपये देणार असल्याचे कळते. जर हा करार झाला तर वॉटसन पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात महागडा प्रशिक्षक होईल. त्याच्या इतर मागण्याही मान्य करण्यास बोर्ड तयार आहे.

वॉटसनचा सर्वाधिक 'भाव'!  
पीसीबीने दिलेल्या ऑफरवर वॉटसन गांभीर्याने विचार करत असल्याचे त्याच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले असल्याचे क्रिकेट पाकिस्तानने सांगितले. वॉटसन आता औपचारिक लेखी ऑफरची वाट पाहत आहे, त्यानंतर यावर शिक्कामोर्तब होऊ शकतो. तसेच त्याने  मालिका किंवा राष्ट्रीय संघाच्या शिबिरांसाठी उपलब्ध राहण्यास तयार असल्याची ग्वाही दिली. 

दरम्यान, शेन वॉटसन केवळ पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटसाठी या पदावर असेल. त्यामुळे पीसीबीला कसोटी क्रिकेटसाठी दुसरा प्रशिक्षक शोधावा लागेल. वहाब रियाझ वॉटसनशी कराराच्या संदर्भात वाटाघाटीतही सहभागी आहे, अशी माहिती क्रिकेट पाकिस्तानने दिली. 

Web Title: Pakistan Cricket Board is ready to pay former Australian player Shane Watson around Rs 4.6 crore per month for the post of head coach 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.