Join us  

पाकिस्तानी फलंदाज देशासाठी खेळतात, भारतीय स्वतःसाठी; पाकचा माजी कर्णधार बरळला

क्रिकेटच्या मैदानावर किंवा बाहेर पाक खेळाडू सतत भारतीय खेळाडूंवर टीका करताना दिसले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 11:50 AM

Open in App

पाकिस्तानी खेळाडू नेहमीच भारतीय क्रिकेटपटूंना लक्ष्य करत आले आहेत. या दोन संघांमधली टशनही क्रिकेटचाहत्यांच्या पसंतीत उतरणारी असते. या दोन देशांमध्ये क्रिकेट मालिका होत नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन्ही देशांच्या आजी-माजी खेळाडूंमध्ये द्वंद्व रंगलेलं पाहायला मिळते. त्यात आता पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हक आणि रमीझ राजा यांची भर पडली आहे. यावेळी दोघांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील अनेक आठवणींना उजाळा दिला. त्यात भारताविरुद्धच्या सामन्यांच्या आठवणीही होत्या.

मोठा निर्णय : 'युनिव्हर्स बॉस' Chris Gayleच्या मदतीला किंग्स इलेव्हन पंजाब धावला

रमीझ आणि इंझमाम यांनी 1992च्या आयसीसी वर्ल्ड कपमधील भारताविरुद्धच्या सामन्याबाबत चर्चा केली. 1992च्या वर्ल्ड कपमध्ये कर्णधार इम्रान खान यांनी कशा प्रकारे संघाचे मनोबल उंचावले, यावरही इंझमाम म्हणाला. त्याने सांगितले,''इम्रान तांत्रिकदृष्ट्या चांगला कर्णधार नव्हता, परंतु संघातील बहुतेक खेळाडूंबद्दल त्याला चांगली माहिती होती. युवा खेळाडूंच्या मागे तो खंबीरपणे उभा राहीला आणि त्यामुळेच तो सर्वोत्तम कर्णधार बनला. एखाद्या मालिकत खेळाडू अपयशी ठरला, म्हणून तो त्याला संघाबाहेर करायचा नाही. तो त्या खेळाडूमध्ये विश्वास निर्माण करायचा. त्यामुळेच सर्व त्याचा आदर करायचे.''

'Sex Video'मुळे महिला खेळाडूचं आयुष्य झालं होतं उद्ध्वस्त; तीन दिवस घरातच होता मृतदेह

या चर्चेत इंझमामने भारतीय खेळाडूंबाबत वादग्रस्त विधान केलं. भारतीय फलंदाज वैयक्तिक शतकासाठी खेळायचे, तर पाकिस्तानी फलंदाजांच्या 30 आणि 40 धावा या संघासाठी असायच्या, असा दावा इंझमामने केला. तो म्हणाला,''आम्ही भारताविरुद्ध खेळायचो, तेव्हा त्यांच्या फलंदाजांची फौज ही कागदावर आमच्यापेक्षा वरचढ दिसायची. मात्र, आमचे फलंदाजांच्या 30 किंवा 40 धावा या संघासाठी असायच्या, तर भारताचे फलंदाज स्वतःसाठी शतक झळकवायचे. दोन देशांतील खेळाडूंमध्ये हा फरक आहे.''

पाहा व्हिडीओ...पाकिस्तान संघाला वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला एकदाही पराभूत करता आलेले नाही. 

टॅग्स :पाकिस्तानभारत विरुद्ध पाकिस्तान