Join us  

पाकिस्तानचा अष्टपैलू मोहम्मद हफीज निवृत्त; ३२ वेळा ठरला सामनावीर

हफीजने २०१८ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.   त्याने पाकिस्तानसाठी ३९२ आंतरराष्ट्रीय सामने खेळले, ज्यात त्याने १२,७८९ धावा केल्या आणि २५३ बळी घेतले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2022 5:57 AM

Open in App

लाहोर :  पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद हफीजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती  जाहीर केली. मोहम्मद हफीज गेल्या १८ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत होता. ‘जियो न्यूज’च्या वृत्तानुसार, पाकिस्तान सुपर लीगच्या आगामी स्पर्धेसाठी लाहोर कलंदर्ससोबत मोहम्मद हफीज करारबद्ध झाला आहे. त्यामुळे ४१ वर्षीय हफीज फ्रॅन्चाईजी क्रिकेटसाठी उपलब्ध असेल. दरम्यान, याबाबत हफीजने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

हफीजने २०१८ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.   त्याने पाकिस्तानसाठी ३९२ आंतरराष्ट्रीय सामने खेळले, ज्यात त्याने १२,७८९ धावा केल्या आणि २५३ बळी घेतले. हफीजने ५५ कसोटी, २१८ एकदिवसीय आणि ११९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने तीन एकदिवसीय विश्वचषक आणि सहा टी-२० विश्वचषकांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व देखील केले.  २००३ मध्ये झिम्बाब्वे विरुद्धच्या एकदिवसीय सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.  शेवटचा सामना नोव्हेंबरमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकातील उपांत्य फेरीचा   त्याला ३२ वेळा सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. 

भ्रष्ट खेळाडूंना देशाकडून संधी मिळू नये: हफीजn खेळात भ्रष्टाचाराचे दोषी आढळलेल्या खेळाडूंना देशाकडून खेळण्याची कधीही संधी देण्यात येऊ नये, असे मत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद हफीज याने व्यक्त केले आहे.n लाहोरमध्ये पत्रकारांशी बोलताना हफीज म्हणाला,‘मॅच फिक्स करणारे आणि देशाशी विश्वासघात करणाऱ्या खेळाडूंना कधीही संधी देऊ नये. माझ्या कारकिर्दीत सर्वात मोठी निराशा म्हणजे मी आणि अझहर अलीने स्पष्ट भूमिका घेतली. मात्र,  बोर्ड अध्यक्षांनी आम्हाला सांगितले की, आपण दोघे खेळणार नसाल तरी काहीच बिघडत नाही, मात्र संबंधित खेळाडू खेळले.’n माझ्या निवृत्तीचा मात्र पीसीबी प्रमुख रमीझ राजा यांच्या भूमिकेशी कुठलाही संबंध नाही.  मला आणि शोएब मलिकला २०१९ च्या विश्वचषकानंतर निवृत्त व्हायला हवे होते.  मी असा निर्णय घेतलादेखील होता. मात्र, पत्नी आणि चाहत्यांनी खेळत राहण्याचा सल्ला दिला होता. मी नेहमी मैदानावर कामगिरीद्वारे स्वत:वरील टीकेला उत्तर दिले आहे.  मी रमीझ यांच्यासह बोर्डमधील कुणावरही नाराज नाही. कुठलाही दुराग्रह न बाळगता आणि कुणाप्रतिही द्वेषभावना न ठेवता मी निवृत्त होत आहे.’

टॅग्स :मोहम्मद हाफीजपाकिस्तान
Open in App