Join us

PAK vs ZIM, 1st ODI: पाकिस्तानच्या फलंदाजांनी झिम्बाब्वेविरुद्धही करून घेतली फजिती, Video

पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यातला पहिला वन डे आजपासून सुरू झाला. पाकिस्तान क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा सुरुवात झाली आणि पहिल्याच सामन्यात पाकिस्तानच्या फलंदाजांनी स्वतःची फजिती करून घेतली

By स्वदेश घाणेकर | Updated: October 30, 2020 16:04 IST

Open in App

पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यातला पहिला वन डे आजपासून सुरू झाला. पाकिस्तान क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा सुरुवात झाली आणि पहिल्याच सामन्यात पाकिस्तानच्या फलंदाजांनी स्वतःची फजिती करून घेतली. पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इमाम-उल-हक आणि अबीद अली यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण, ४७ धावांवर असताना अली ( २१) माघारी परतला. कर्णधार बाबर आझम ( १९) यालाही मोठी खेळी करता आली नाही. इमाम-उल-हक चांगल्या फॉर्मात दिसत होता, त्यानं अर्धशतकही झळकावलं. पण, खेळपट्टीवरील पाकिस्तानी फलंदाजांच्या फजितीचा कित्ता याही सामन्यात त्यांनी गिरवला. इमाम-उल-हक आणि हरिस सोहेल यांच्यातला ताळमेळ चुकला आणि दोन्ही फलंदाज एकाच एंडला धावले. मग, काय झिम्बाब्वेला आयती विकेट मिळाली.

इमाम-उल-हक ७५ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीनं ५८ धावांवर धावबाद झाला. त्यानंतर सोहेलनं अर्धशतकी खेळी केली. त्यानं ८२ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ७१ धावा केल्या. पाकिस्तानचे अन्य फलंदाज टप्प्याटप्यानं माघारी परतल्यानं त्यांना ४५ षटकांत ६ बाद २४६ धावा करता आल्या आहेत.

लाईव्ह मॅच....

टॅग्स :पाकिस्तानझिम्बाब्वे