पाकिस्तानवर अन्याय झाला! हरभजन सिंग, इरफान पठाणकडून बाबर आजमच्या टीमसाठी 'बॅटींग'; म्हणाले...

PAK vs SA : चेन्नई येथे झालेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान सामना चुरशीचा झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 11:17 AM2023-10-28T11:17:49+5:302023-10-28T11:18:18+5:30

whatsapp join usJoin us
PAK vs SA : 'Bad Umpiring Cost Pakistan': Harbhajan Singh & Irfan Pathan Blasts Controversial Rule of umpire call | पाकिस्तानवर अन्याय झाला! हरभजन सिंग, इरफान पठाणकडून बाबर आजमच्या टीमसाठी 'बॅटींग'; म्हणाले...

पाकिस्तानवर अन्याय झाला! हरभजन सिंग, इरफान पठाणकडून बाबर आजमच्या टीमसाठी 'बॅटींग'; म्हणाले...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

PAK vs SA : चेन्नई येथे झालेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान सामना चुरशीचा झाला.  २७१ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका एकवेळी फ्रंटसीटवर बसले होते, परंतु पाकिस्तानी गोलंदाजानी उशिरा पुनरागमन केले आणि सामना डेथ ओव्हर्समध्ये नेला. आफ्रिकेच्या संघाने हा सामना १ विकेटने जिंकला. १९९९नंतर प्रथमच आफ्रिकेने वर्ल्ड कप स्पर्धेत ( वन डे व ट्वेंटी-२०) पाकिस्तानवर विजय मिळवला. हा सामना पंचांच्या वादग्रस्त निर्णयांमुळे गाजला आणि भारताचे माजी खेळाडू हरभजन सिंगइरफान पठाण पाकिस्तानच्या सपोर्टमध्ये पुढे आले.

इतरांच्या हाती पाकिस्तानचं नशीब! बाबर आजम अँड टीमला उपांत्य फेरीची अजूनही संधी

अनेकांनी पाकिस्तानच्या पराभवासाठी Umpire Calls ला दोष दिला. आफ्रिकेला विजयासाठी ९ धावांची गरज होती आणि हारिस रौफने टाकलेला चेंडू तब्रेझ शम्सीला चकवून डाव्या बाजूने मागे गेला आणि पाकिस्तानी खेळाडूंनी झेलसाठी जोरदार अपील झाले. मैदानावरील पंचांनी हा वाइड म्हटले आणि रिप्लेत चेंडू बॅटला लागल्याचे अल्ट्रा-एजमध्ये दिसले. एक चेंडू नंतर, मैदानावरील खेळाडूने शम्सीविरुद्ध LBW चे अपील फेटाळले. मैदानावरील अम्पायरने नाबाद दिल्यानं पाकिस्तानी संघाने DRS घेतला आणि ऑन-फिल्ड अम्पायर कॉल सांगून तो निर्णय कायम ठेवला. 

भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग याने 'खराब अम्पायरिंग' आणि 'खराब नियमांमुळे पाकिस्तानला  फटका बसला' असा आरोप केला आणि शम्सीला वाचवणारे 'अम्पायर कॉल नियम' बदलण्याची सूचना आयसीसीला केली. “खराब अंपायरिंग आणि चुकीच्या नियमांमुळे पाकिस्तानला फटका बसला. ICC ने हा नियम बदलायला हवा. जर चेंडू स्टंपला लागला तर अम्पायरने आऊट दिला की नॉट आउट काही फरक पडत नाही. नाहीतर तंत्रज्ञानाचा उपयोग काय?,” असे हरभजनने ट्विट केले.  


इरफान पठाण यानेही निर्णयावर नाराजी व्यक्त केली. त्याने ट्विट केले की, पाकिस्तानच्या विरोधात दोन निर्णय गेले. वाईड आणि पायचीत... वर्ल्ड कप स्पर्धेतील या थरारक सामन्यात नशीब दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने होते.  

Web Title: PAK vs SA : 'Bad Umpiring Cost Pakistan': Harbhajan Singh & Irfan Pathan Blasts Controversial Rule of umpire call

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.