Join us
Daily Top 2Weekly Top 5

ओल्ले डेविसची विक्रमी षटकारासह द्विशतकी खेळी

आॅस्ट्रेलियाचा युवा फलंदाज ओल्ले डेविसने १९ वर्षांखालील राष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामन्यात एका षटकात सहा षटकार ठोकत विक्रमी द्विशतक झळकाविले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 04:32 IST

Open in App

अ‍ॅडिलेड : आॅस्ट्रेलियाचा युवा फलंदाज ओल्ले डेविसने १९ वर्षांखालील राष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामन्यात एका षटकात सहा षटकार ठोकत विक्रमी द्विशतक झळकाविले. क्रिकेट आॅस्ट्रेलियाच्या संकेतस्थळावर हा खेळाडू झळकला. न्यू साउथ वेल्स मेट्रो टीमचा कर्णधार ओल्ले याने नॉर्थन टेरेटरीविरुद्ध ११५ चेंडूंत विक्रमी १७ षटकारांसह १४ चौकारांच्या मदतीने २०७ धावांची खेळी केली. त्याच्या या योगदानामुळे संघाने ४ बाद ४०६ धावा केल्या. ओल्लेने आपल्या डावात ४० व्या षटकात ६ षटकार लावले. त्याने शतकानंतर दुसरे शतक पूर्ण करण्यासाठी केवळ ३९ चेंडूंचा सामना केला. आॅस्ट्रेलियाच्या स्थानिक १९ वर्षांखालील क्रिकेटमध्ये २००१-०२ मध्ये जेसन क्रेझा याच्यानंतर हे पहिले दुहेरी शतक आहे.