नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासकांच्या समितीने (सीओए) बोर्डाच्या भ्रष्टाचार विरोधी समितीचे (एसीयू) प्रमुख नीरज कुमार यांना वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर पत्नी हसीनने केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.हसीनने शमीविरुद्ध कथित व्यभिचार व कौटुंबिक कलहाचा आरोप करताना पोलिसांकडे तक्रार केली आहे. राय यांनी कुमार यांना शमीवर केलेल्या भ्रष्टाचाराबाबतच्या आरोपांची चौकशी करून आठवड्याभरात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे या पत्रात कुठेही ‘मॅच फिक्सिंग’ या शब्दाचा वापर करण्यात आलेला नाही.शमीवरील विविध आरोपांमुळे बीसीसीआयने त्याचा केंद्रीय करार रोखला आहे. राय यांनी पत्रात लिहिले आहे की,‘हे पत्र मोहम्मद शमीविरुद्धच्या आरोपासंबंधित विविध प्रसारमाध्यमांबाबत आहे. प्रशासकांच्या समितीने दूरध्वनीवरील झालेल्या संभाषणाची ध्वनिफित ऐकली. ही ध्वनिफित शमी व त्याच्या पत्नीदरम्यानची बातचित असल्याचा दावा करण्यात आला आहे. ही ध्वनिफित पब्लिक डोमेनमध्येआहे.’हसीनने आरोप केला होता की,‘शमीने इंग्लंडचा व्यापारी मोहम्मद भाईने सांगितल्यानुसार पाकिस्तानी महिला अलिश्बाकडून पैसे घेतले होते.’ प्रशासकांचीसमिती या आॅडिओ रेकॉर्डिंगमुळे चिंतेत आहे. करण्यात आलेल्या दाव्यानुसार त्यात शमीने मोहम्मद भाईचे नाव घेतल्याचे ऐकता येते. त्यात पाकिस्तान महिला अलिश्बाच्या माध्यमातून शमीला पैसा दिला गेला आहे. (वृत्तसंस्था)राय यांनी म्हटले की, ‘बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी संहितेनुसार कृपया या आरोपांची चौकशी करावी आणि सीओएकडे आपला अहवाल सोपवावा.’राय यांनी पुढे म्हटले आहे की,‘या प्रकरणाची चौकशी तीन मुद्यांवर व्हायला हवी. पहिले म्हणजे मोहम्मद भाई आणि अलिश्बा यांची ओळख व पूर्वीचा इतिहास, दुसरे मोहम्मद भाईतर्फे शमीला अलिश्बाच्या माध्यमातून कुठली रक्कम पाठविण्यात आली का, आणि तिसरे जर रक्कम पाठविण्यात आली तर त्याचा उद्देश काय होता ? प्रकरणाची चौकशी केवळ भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत राहील, असेही राय यांनीम्हटले आहे.राय यांनी स्पष्ट केले की,‘प्रकरणाची चौकशी केवळ वर उल्लेख केलेल्या मुद्यावर मर्यादित राहील. शमीवरील दुसरे आरोप जोपर्यंत बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी संहितेमध्ये येत नाही, तोपर्यंत त्याबाबत विचार करण्याची गरज नाही.’गेल्या आठवड्यात हसीनने फेसबुकच्या माध्यमातून शमीवर दगा दिल्याचा आरोप करताना कौटुंबिक कलहाची बळी ठरल्याचे म्हटले होते. दरम्यान, शमीने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावताना हा बदनाम करण्याचा व कारकीर्द संपविण्याचा कट असल्याचे म्हटले होते.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- शमीविरुद्ध चौकशी करण्याचे आदेश, विनोद राय यांचे एसीयू प्रमुखांना निर्देश
शमीविरुद्ध चौकशी करण्याचे आदेश, विनोद राय यांचे एसीयू प्रमुखांना निर्देश
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासकांच्या समितीने (सीओए) बोर्डाच्या भ्रष्टाचार विरोधी समितीचे (एसीयू) प्रमुख नीरज कुमार यांना वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर पत्नी हसीनने केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 04:15 IST