Join us  

"आयपीएलबाबत आशावादी, विराट कोहली आणि अस्वलाला डिवचणे सारखेच"

कोहलीला डिवचणे म्हणजे संकट ओढवून घेण्यासारखे आहे. त्याच्या मते, कोहलीला डिवचणे आणि अस्वलासोबत पंगा घेणे एकसारखे आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 1:08 AM

Open in App

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरला विराट कोहलीच्या फलंदाजीची भीती वाटते. त्याच्या मते, कोहलीला डिवचणे म्हणजे संकट ओढवून घेण्यासारखे आहे. त्याच्या मते, कोहलीला डिवचणे आणि अस्वलासोबत पंगा घेणे एकसारखे आहे. वॉर्नर म्हणाला, ‘रिकाम्या स्टेडियममध्ये भारताच्या आव्हानाला सामोरे जाणे अवास्ताविक असेल. मी संघात स्थान मिळविण्यास प्रयत्नशील आहो. मी मालिकेत खेळण्यास उत्सुक आहो. गेल्या मालिकेत आमची कामगिरी खराब नव्हती, पण चांगल्या संघाने आम्हाला पराभूत केले होते. भारताची गोलंदाजी शानदार आहे. आता भारताची फलंदाजीची बाजूही मजबूत आहे. आमचे गोलंदाजा त्यांच्याविरुद्ध वर्चस्व गाजवण्यास उत्सुक असून, भारतीय चाहत्यांना या मालिकेची प्रतीक्षा असेल.’वॉर्नर आशावादी व सकारात्मक आहे. कोविड-१९ महामारीमुळे टी-२० विश्वकप स्पर्धा स्थगित झाली तर त्याच्यासह आॅस्ट्रेलियातील अन्य खेळाडंूना इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेत खेळता येईल.क्रिकेट आॅस्ट्रेलियाचे (सीए) अध्यक्ष अर्ल एडिंग्स यांनी यापूर्वीच म्हटले आहे की, आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये १६ संघांचा समावेश असलेल्या स्पर्धेचे यजमानपद भूषविणे ‘अवास्तविक’ होईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मात्र टी-२० विश्वकप स्पर्धेच्या भविष्याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही. याबाबत निर्णय पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे.वॉर्नरने म्हटले की,‘जर विश्वकप स्पर्धेच्या आयोजनाची शक्यता नसेल तर आम्ही आशावादी व सकारात्मक आहोत की आम्हाला आयपीएलमध्ये खेळता येईल.’वॉर्नर पुढे म्हणाला,‘जर क्रिकेट आॅस्ट्रेलियाने आम्हाला आयपीएलमध्ये सहभागी व्हायची परवानगी दिली तर आम्ही क्रिकेट खेळण्यासाठी येऊ, असा मला विश्वास आहे.’संघांच्या संख्येचा विचार करता टी-२० विश्वकप स्पर्धेचे आयोजन कठीण आहे, असे वॉर्नरने यापूर्वीही म्हटले आहे. आम्ही याबाबत आयसीसीच्या निर्णयाची प्रतीक्षा करीत आहोत.वॉर्नर म्हणाला,‘टी-२० विश्वकप स्पर्धा स्थगित करण्याबाबत बरीच चर्चा होत आहे. आॅस्ट्रेलियात विश्वकप स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रत्येक देशाच्या संघाला आणणे आव्हानात्मक असेल. कारण १४ दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी आहे. याव्यतिरिक्त आॅस्ट्रेलियात कोविड-१९ चा पुन्हा प्रादुर्भाव होणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागेल. आॅस्ट्रेलियन सरकारने सध्या निर्बंध लावलेले आहेत. निश्चितच आम्हाला या नियमांचे पालन करावे लागेल आणि त्याचसोबत आयसीसीच्या निर्णयाची प्रतीक्षाही करावी लागेल.’चेंडू छेडखानी प्रकरणामुळे निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागल्यामुळे २०१८-२९ मध्ये भारताविरुद्धच्या यापूर्वीच्या मायदेशातील मालिकेत खेळू न शकलेला वॉर्नर टीम इंडियाविरुद्ध आॅस्ट्रेलियात चार कसोटी सामन्यांच्या आगामी मालिकेत खेळण्यास उत्सुक आहे. या हायप्रोफाईल मालिकेत भारतीय कर्णधार विराट कोहलीला डिवचण्याचा प्रयत्न करणार नसल्याचे वॉर्नर म्हणाला. (वृत्तसंस्था)अनेक आॅस्ट्रेलियन खेळाडू आयपीएलमध्ये खेळण्यास इच्छुक आहेत. जर टी-२० विश्वकप व आशिया कप स्पर्धा स्थगित झाल्या तर या स्पर्धेचे आयोजन सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये होणे शक्य आहे. मंजुरी मिळाली तर लिलावामध्ये निवड झालेले सर्व खेळाडू खेळण्याची पूर्ण शक्यता आहे. आम्हाला प्रवास करावा लागणार आहे, त्यामुळे सरकारची मंजुरी घ्यावी लागेल. जर क्रिकेट आॅस्ट्रेलियाने आम्हाला तेथे जाण्याची व स्पर्धा खेळण्याची परवानगी दिली तर खेळाडू पुन्हा क्रिकेट खेळण्यासाठी तयार होतील.

टॅग्स :विराट कोहली