Join us  

Good News : टीम इंडियाला श्रीलंका दौऱ्यावर पाठवण्यास BCCI तयार, पण...

कोरोना व्हायरसमुळे गेली दोन-अडीच महिने सर्व क्रिकेट स्पर्धा रद्द झाल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 12:35 PM

Open in App

कोरोना व्हायरसमुळे गेली दोन-अडीच महिने सर्व क्रिकेट स्पर्धा रद्द झाल्या आहेत. इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) 13 व्या मोसमावरही अनिश्चिततेचं सावट आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांचा प्रचंड हिरमोड झाला आहे. पण, आता त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. टीम इंडियाला जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर पाठवण्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) तयारी दर्शवली आहे. भारतीय संघ या दौऱ्यावर तीन वन डे आणि तीन  ट्वेंटी-20 मालिका खेळणार आहे. पण, खेळाडूंचे आरोग्य आणि सुरक्षितता यात कोणत्याही प्रकारची तडजोड केली जात नसेल, तरच हा दौरा होईल, असे स्पष्ट संकेत बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाल यांनी दिले.

''लॉकडाऊनच्या नव्या नियमात शिथिलता मिळते का आणि प्रवासावरील निर्बंध हटतात का, त्यावर पुढील सर्व अवलंबून आहे. खेळाडूंचे आरोग्य आणि सुरक्षितता यात कोणतीही तडजोड होता कामा नये, तरच आम्ही हा दौरा करण्यास तयार आहोत,''असे धुमाल यांनी स्पष्ट केले.

शुक्रवारी श्रीलंका क्रिकेट मंडळानं ( SLC) बीसीसीआयला ई मेल पाठवून ही मालिका खेळवण्याची विनंती केली. The Island या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार श्रीलंका क्रिकेट मंडळ जुलैच्या अखेरच्या टप्प्यात भारताविरुद्ध मर्यादित षटकांच्या सामन्यांची मालिका खेळण्यास उत्सुक आहेत. त्यांनी त्या संदर्भात बीसीसीआयला मेलही पाठवला आहे आणि त्यांना बीसीसीआयच्या उत्तराची प्रतीक्षा आहे. या मेलमध्ये त्यांनी या मालिकेचा गांभीर्यानं विचार करावा असे म्हटले आहे.  

''या दौऱ्यावर खेळाडूंना क्वारंटाईनच्या नियमांचं काटेकोर पालन करायला हवं आणि हे सामने प्रेक्षकांविना खेळवण्यात येतील,''अशी माहिती लंकन मंडळाच्या अधिकाऱ्यानं दिली. पण, जोपर्यंत सरकारकडून स्पष्ट सूचना मिळत नाही, तोपर्यंत संघ दौऱ्यावर जाणार नाही, हे बीसीसीआयनं आधीच स्पष्ट केलं आहे. यापूर्वी इंग्लंडनं कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लंकन दौरा सोडला होता. भारतानेही हा दौरा न केल्यास लंकन मंडळाला मोठं आर्थिक नुकसान होणार आहे. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

पाकमधील हिंदूंना अन्न वाटप करणारा शाहिद आफ्रिदी बांगलादेशच्या मदतीला धावला

Video : म्युझिक व्हिडीओसाठी लिओनेल मेस्सीचे पत्नीसोबत लिपलॉप; नेटिझन्सकडून ट्रोल

पतीच्या आठवणीनं सानिया मिर्झा भावुक; म्हणाली, इझान आपल्या बाबांना कधी भेटेल माहीत नाही!

Video : अनुष्कानं टाकला विराटला बाऊंसर; विरुष्काचा क्रिकेट सामना पाहिलात का?

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाबीसीसीआय