केवळ यंदाच्या वर्षी ड्रीम ११ प्रायोजक, बीसीसीआयचा निर्णय

ड्रीम ११ कंपनीलाच वाढीव बोलीवर २०२२ पर्यंत करार वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता ड्रीम ११ सोबतचा करार २०२० पुरताच असेल, असे बीसीसीआयने बुधवारी उशिरा स्पष्ट केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 02:41 AM2020-08-20T02:41:15+5:302020-08-20T06:44:55+5:30

whatsapp join usJoin us
Only this year Dream 11 sponsor, BCCI's decision | केवळ यंदाच्या वर्षी ड्रीम ११ प्रायोजक, बीसीसीआयचा निर्णय

केवळ यंदाच्या वर्षी ड्रीम ११ प्रायोजक, बीसीसीआयचा निर्णय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : भारत-चीन यांच्यातील ताणल्या गेलेल्या संबंधामुळे बीसीसीआयने आयपीएलच्या १३ व्या पर्वाचे प्रायोजकपद ‘फॅ न्टसी स्पोर्ट्स गेम कंपनी’ ड्रीम ११ ला दिले. चार महिने १४ दिवसाच्या करारापोटी कंपनीने २२२ कोटी मोजले आहेत. पुढच्या सत्रात दोन्ही देशामधील संबंध सुधारले नाही तर पर्याय म्हणून ड्रीम ११ कंपनीलाच वाढीव बोलीवर २०२२ पर्यंत करार वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता ड्रीम ११ सोबतचा करार २०२० पुरताच असेल, असे बीसीसीआयने बुधवारी उशिरा स्पष्ट केले.
१९ सप्टेंबरपासून यूएईत होणाऱ्या आयपीएलसाठी ड्रीम ११ प्रायोजक असेल मात्र पुढील दोन वर्षे कमी पैसे मोजल्याने या कंपनीची बोली फेटाळण्यात आल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. ड्रीम ११ (स्पोर्टो टेक्नॉलॉजी प्रा. लि.) ही मुंबईस्थित भारतीय कंपनी आहे. बीसीसीआयने ड्रीम ११ सोबत पुढील तीन वर्षांसाठी सशर्त चर्चा केली. विवोप्रमाणे प्रत्येक वर्षाला ४४० कोटी मोजण्याची आम्ही अट ठेवली, मात्र या कंपनीने प्रत्येक वर्षाला २४० कोटी देण्याची तयारी दर्शवताच बीसीसीआयने बोली नामंजूर केल्याचे बोर्डाच्या अधिकाºयाने सांगितले. आयपीएल चेअरमन ब्रिजेश पटेल म्हणाले,‘ड्रीम ११ ला यंदा २२२ कोटी रुपयांत प्रायोजकपद करार देण्याचे आम्ही स्वागत करतो. मात्र पुढच्या वर्षी आम्ही ४०० कोटींची अपेक्षा करीत असल्याने नव्याने निविदा मागवू.’ विवोने पुन्हा प्रायोजकपद नाकारले तरी २०२१ आणि २०२२ च्या सत्रासाठी आम्ही ४०० कोटीहून कमी बोली स्वीकारणार नाही,असे त्यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने स्वत:चे नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, २०२० पुरते बोलयाचे तर २२२ कोटी ठिक आहेत.दुसरीकडे विवोसोबतचा आमचा करार अद्याप कायम आहे. हा करार संपला नाही, तर केवळ स्थगित झाला आहे. ४४० कोटी मिळत असतील तर ड्रीम ११ चे २४० कोटी आम्ही का स्वीकारावे?’ चार महिने १४ दिवसांसाठी २२२ कोटी रुपयांचा करार संपताच बीसीसीआय पुन्हा विवोला पसंती देऊ शकेल. (वृत्तसंस्था)
>चीनच्या भागीदारीवर ‘वाद’
ड्रीम ११ सोबत करार करुन बीसीसीआयला पुन्हा नाराजी स्वीकारावी लागत आहे. ड्रीम ११ कंपनीत चीन आणि हाँगकाँगचा पैसा हा मुख्य मुद्दा आहे. २०१८ ला ड्रीम ११ मध्ये चीनची कंपनी टेसेंटने १० कोटीची गुंतवणूक केली. चीनच्या नियंत्रणाखालील हाँगकाँगच्या ‘स्टेडव्ह्यू’या कंपनीने देखील यात ६ कोटी डॉलरची रक्कम गुंतवली आहे.
>बीसीसीआयचा खुलासा...
ड्रीम ११ कंपनीमध्ये चीनची गुंतवणूक आहे, ही गोष्ट पुढे आली . त्यावर बीसीसीआयने खुलासा केला आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाºयाने सांगितले की,‘ इंटरनेट जायंट टेंसेंट, या कंपनीची ड्रीम ११ मध्ये १० टक्क्याहून कमी भागीदारी आहे. ड्रीम ११ चे संस्थापक भारतीय आहेत. कंपनीमध्ये जे ४०० पेक्षा अधिक लोक काम करतात तेदेखील भारतीय आहेत. ड्रीम इलेव्हनमध्ये भारतीय कंपन्यांची मोठी गुंतवणूक असून हे अ‍ॅप भारतातच सर्वाधिक वापरले जाते.’

Web Title: Only this year Dream 11 sponsor, BCCI's decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.