Join us  

तरच भारतीय संघात संघात प्रवेश - शास्त्री

जो संघ विश्वचषकात खेळेल त्यामधील खेळाडू हे पूर्णपणे फिट असतील आणि फिल्डींगच्या बाबतीत श्रेष्ठ असतील. ते आपला फिटनेस कायम ठेवतील त्यांनाच पुढे संधी देण्यात येईल असे मत भारतीय संघाचे कोच रवी शास्त्री यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2017 6:57 PM

Open in App

नवी दिल्ली, दि. 16 : आगामी विश्वकप स्पर्धेसाठी संघ नियोजनाची सुरुवात केली आहे. ज्यावेळी  विश्वचषकाचा विचार करतो तेव्हा माझं स्पष्ट मत असतं की, जो संघ विश्वचषकात खेळेल त्यामधील खेळाडू हे पूर्णपणे फिट असतील आणि फिल्डींगच्या बाबतीत श्रेष्ठ असतील. ते आपला फिटनेस कायम ठेवतील त्यांनाच पुढे संधी देण्यात येईल असे मत भारतीय संघाचे कोच रवी शास्त्री यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं आहे. टीम इंडियाने अपेक्षित विराट कामगिरी करताना श्रीलंकेला त्यांच्याच भूमीमध्ये लोळवले. विशेष म्हणजे 3 कसोटी सामन्यांची मालिका 3-0 अशी निर्विवादपणे जिंकून भारतीय संघाने परदेशात पहिल्यांदाच क्लीनस्वीप नोंदवला. यावर ते म्हणाले की, संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. भविष्यातही हे खेळाडू आपली कामगिरी चोख बजावतील. पुढे बोलताना ते म्हणाले की, भविष्यात आपल्याला टेस्ट क्रिकेट खूप खेळायचे आहेत. टेस्ट क्रिकेटबरोबरच विश्वचषकावरही लक्ष द्यायला हवं. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि द. आफ्रिका सारखे संघ विश्वचषक आणि कसोटीसाठी विशेष प्लॅन तयार करत असतात. रवी शास्त्री यांच्या या भूमिकेमुळे संघातील दिग्गज खेळाडूंना आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रीत करावं लागणार आहे. वनडे आणि टी 20 सामन्यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी दोन वर्षापूर्वी कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला होता. धोनीशिवाय युवराज सिंगला आपल्या फिटनेस आणि खेळावर लक्ष केंद्रीत करावं लागण्याची शक्यता आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यामध्ये या दोन्ही दिग्गजांना लौखिकास साजेशी खेळी करण्यात अपयश आले होतं. 

दरम्यान,  भारताचा माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही, तर अन्य पर्यायांचा विचार केला जाईल, असे वक्तव्य निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी सोमवारी केले होते  कसोटी मालिकेत श्रीलंकेचा ३-० ने सफाया केल्यानंतर प्रसाद म्हणाले, ‘आम्ही प्रमुख खेळाडूंना रोटेशन व विश्रांती देण्याच्या नीतीवर कार्य करीत आहोत. त्यामुळे आगामी काही महिन्यांमध्ये युवा खेळाडूंच्या कामगिरीचे आकलन करता येईल. या वर्षाअखेरीस संघाचे स्वरूप स्पष्ट होईल.’ प्रसाद पुढे म्हणाले, ‘विश्वकप संघात स्थान मिळवण्याच्या शर्यतीत माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीसह युवराज सिंग व सुरेश रैना यांचाही समावेश आहे.’ ऋषभ पंतबाबत बोलताना प्रसाद म्हणाले, ‘टी-२० क्रिकेटमध्ये तो चांगला खेळाडू असल्याची आपल्याला कल्पना आहे. आम्ही त्या प्रकारामध्ये त्याची चाचणी घेऊ. हार्दिक पांड्याने टी-२० मध्ये ओळख निर्माण केल्यानंतर कसोटी संघापर्यंतचा पल्ला गाठला आहे.मी प्रामाणिकपणे सांगेल. चर्चा प्रत्येक खेळाडूची होती. असं नाही की केवळ महेंद्रसिंग धोनीचीच चर्चा झाली. जेव्हा संघ निवडला जातो तेव्हा आम्ही संघाचा ताळमेळ राखण्यावर भर देतो. यासाठी आम्ही प्रत्येक खेळाडूवर चर्चा करतो. धोनीच्या भविष्याबाबत बोलणे कठिण आहे. मात्र, जोपर्यंत तो संघाच्या कामगिरीत योगदान देत राहणार तोपर्यंत त्याच्या भविष्याची नक्कीच चिंता नसेल. धोनीबाबतही चर्चा झाली. एक मात्र नक्की की धोनीची कामगिरी खालावली तरच त्याच्या पर्यायाचा विचार होईल. फिटनेससाठी काही निकष ठरविण्यात आले असून, त्याचे सर्व खेळाडूंना पालन करावे लागेल. खेळाडूंच्या तंत्राचा विचार करता भारतीय संघ जगात अव्वल स्थानी आहे; पण फिटनेसवर मेहनत घेण्याची गरज आहे.