Join us  

विदेशातील कामगिरीसाठी केवळ भारतच टार्गेट का? प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा संतप्त प्रश्न

शास्त्री म्हणाले, ‘आम्हाला हार्दिक पांड्याची उणीव भासेल. तो दुखापतग्रस्त आहे. तो गोलंदाज व फलंदाज म्हणून संघाचा समतोल साधतो. त्यामुळे आम्हाला अतिरिक्त गोलंदाज खेळविता येतो. तो लवकर फिट होईल, अशी आशा आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 2:23 AM

Open in App

ब्रिसबेन : भारतीय संघाला विदेशातील अपयशी कामगिरीचा ठप्पा अद्याप पुसून काढता आलेला नाही. पण अनेक संघ विदेशात चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरले आहेत; त्यामुळे केवळ भारतीय संघाला टार्गेट करणे योग्य नाही, असे संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटले आहे.भारताला २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिका (१-२) आणि इंग्लंड (१-४) यांच्याविरुद्ध त्यांच्या भूमीत पराभव स्वीकारावा लागला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाकडे कामगिरीत सुधारणा करण्याची चांगली संधी आहे, असे मानले जात असताना हे घडले आहे.भारताला आॅस्ट्रेलियामध्ये मालिका जिंकणे किती महत्त्वाचे आहे, याबाबत बोलताना शास्त्री म्हणाले, ‘यापूर्वी केलेल्या चुकांमधून बोध घ्यावा लागेल. वर्तमान क्रिकेटमध्ये अनेक संघांना विदेशात चांगली कामगिरी करणे जमले नाही. आॅस्ट्रेलियाने १९९० च्या दशकात आणि त्यानंतरच्या दशकात काही काळ असे केले. दक्षिण आफ्रिका संघही काही काळ यात यशस्वी ठरला. या दोन संघांचा अपवाद वगळता गेल्या पाच-सहा वर्षांत कुठल्या संघाने विदेशात चांगली कामगिरी केली आहे? तर मग भारताचेच नाव का घेतले जाते.’दक्षिण आफ्रिका व इंग्लंडमध्ये का पराभव स्वीकारावा लागला, याबाबत कर्णधार कोहली किंवा संघासोबत चर्चा केली का, याबाबत बोलताना शास्त्री म्हणाले, ‘आम्ही मिळालेल्या संधीचा लाभ घेण्याबाबत चर्चा केली. कसोटी सामन्यांचा विचार करता निकाल सर्वकाही स्पष्ट करणारा नसतो. काही सामने चुरशीचे झाले आणि काही संधी आम्ही गमावल्यामुळे त्यामुळे अखेर आम्हाला मालिका गमवावी लागली.’गेल्या काही महिन्यांमध्ये जे काही घडले त्यामुळे आॅस्ट्रेलिया संघाने आपला दर्जा गमावला, याबाबत बोलताना शास्त्री म्हणाले,‘मला तसे वाटत नाही. जर तुमच्यामध्ये क्रीडा संस्कृती रुजली तर ती नेहमीसाठी असते. गृहमैदानावर कुठलाच संघ कमकुवत नसतो, असे माझे मत आहे. असे घडायला नको, पण जर एखाद्या वेळी कुठला संघ भारत दौऱ्यावर आला आणि आपले तीन-चार खेळाडू खेळत नसतील, पण जर कुणी संघ कमकुवत आहे, असा विचार करत असेल तर तुम्हाला आश्चर्यचकित व्हावे लागू शकते.’प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी यावेळी इशारा देताना सांगितले की, ‘आम्ही कुणा आरोपींविरुद्ध खेळत नसून आम्ही मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करण्यास उत्सुक आहोत. बाहेरच्या बाबींवर लक्ष देण्यापेक्षा आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करण्यास प्रयत्नशील आहोत. आमच्या वेगवान गोलंदाजांना आॅस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर गोलंदाजी करताना आनंद होईल.’रवी शास्त्री यांनी पुढे सांगितले की,‘जर आॅस्टेÑलियातील खेळपट्ट्या पूर्वीप्रमाणे असतील तर वेगवान गोलंदाजांना येथे गोलंदाजी करताना आनंद होईल. संघ म्हणून सर्व खेळाडू तंदुरुस्त असणे महत्त्वाचे आहे.’ (वृत्तसंस्था)शास्त्री म्हणाले, ‘आम्हाला हार्दिक पांड्याची उणीव भासेल. तो दुखापतग्रस्त आहे. तो गोलंदाज व फलंदाज म्हणून संघाचा समतोल साधतो. त्यामुळे आम्हाला अतिरिक्त गोलंदाज खेळविता येतो. तो लवकर फिट होईल, अशी आशा आहे. जर वेगवान गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली तर आम्हाला त्याची उणीव भासणार नाही.’

स्लेजिंग ऐवजी दर्जेदार खेळ आवश्यकआॅस्ट्रेलिया संघाची मैदानावरील देहबोली बघितल्यानंतर त्यांनी यापूर्वीच्या वर्तनात बदल केल्याचे दिसून येते आणि मालिकेच्या निकालावरून क्रिकेटचा स्तर ठरविता येईल, असे मत रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. आॅस्ट्रेलियन संघ गेल्या अनेक वर्षांपासून आक्रमक क्रिकेट खेळत असून त्यात स्लेजिंगचाही समावेश आहे.शास्त्री म्हणाले, ‘शेवटी सर्वकाही खेळावर अवलंबून आहे. ग्लेन मॅक् ग्रा किंवा शेन वॉर्न जर काही बोलत असतील त्यामुळे मला काही फरक पडत नाही. त्यानंतर ते बळी घेतात. जर तुम्ही कामगिरीत सातत्य राखत असाल तर कुठल्या संघाकडून खेळता याला अर्थ नसतो. जर खेळाडूने चांगली कामगिरी केली तर त्याच्या संघाचीही कामगिरी चांगली होते.’यंदा केपटाऊनमध्ये चेंडू छेडछाड प्रकरणात स्टीव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्यानंतर संघातील खेळाडूंच्या वर्तनात बदल झाला आहे. टीकाकारांनी या घटनेसाठी कुठल्याही स्थितीत विजय मिळविण्याची मानसिकता कारणीभूत असल्याचे म्हटले होते.कोहलीच्या आक्रमक वर्तनाबाबत शास्त्री म्हणाले, ‘तो व्यावसायिक खेळाडू असून परिपक्व झालेला आहे. त्याला तुम्ही चार वर्षांपूर्वी (२०१४-१५) बघितले. त्यानंतर तो जगभर खेळला आणि संघाचे नेतृत्वही केले. त्यामुळे तुमच्यावर अतिरिक्त जबाबदारी येते.’कोहलीने आॅस्ट्रेलियात पाच शतके (२०११-१२ मध्ये एक आणि २०१४-१५ मध्ये चार) ठोकली आहेत. आॅस्ट्रेलियातील परिस्थितीत भारतीय कर्णधाराच्या खेळाला अनुकूल आहे, असे शास्त्री म्हणाले.कोहलीला आॅस्ट्रेलियात खेळणे आवडते. येथील खेळपट्ट्या त्याच्या शैलीला अनुकूल आहेत. जर तुम्ही एकदा येथे चांगली कामगिरी केली तर तुम्हाला वारंवार येथे खेळायला आवडते. क्रिकेट खेळण्यासाठी आॅस्ट्रेलिया शानदार आहे,असेही शास्त्री म्हणाले.

टॅग्स :रवी शास्त्री