केवळ हार्दिक पांड्याचाच बर्थ डे ठरला 'हॅप्पी'

यंदाच्या आयपीएलमध्ये त्याच्या वाढदिवसाआधी सनरायजर्सच्या जाॕनी बेयरस्टोचा वाढदिवस झाला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 04:15 PM2020-10-13T16:15:01+5:302020-10-13T16:15:13+5:30

whatsapp join usJoin us
Only Hardik Panda's birthday was 'Happy' | केवळ हार्दिक पांड्याचाच बर्थ डे ठरला 'हॅप्पी'

केवळ हार्दिक पांड्याचाच बर्थ डे ठरला 'हॅप्पी'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

-ललित झांबरे

यंदाच्या आयापीएलमधील एक विचित्र मालिका हार्दिक पांड्याने रविवार, 11 रोजी खंडीत केली. रविवारी दिल्ली कॅपिटल्सविरुध्द तो  भोपळाही फोडू शकला नाही पण मुंबईने सामना पाच गडी राखून जिंकला आणि हार्दिकच्या वाढदिवसाचा आनंद त्यादिवशी द्विगुणीत झाला. 

यंदाच्या आयपीएलमध्ये त्याच्या वाढदिवसाआधी सनरायजर्सच्या जाॕनी बेयरस्टोचा वाढदिवस झाला. किंग्ज इलेव्हनच्या ख्रीस जाॕर्डनचाही वाढदिवस झाला. राॕयल चॕलेंजर्सच्या वाॕशिंग्टन सुंदर, चेन्नई सुपर किंग्जचा ड्वेन ब्राव्हो यांचेसुध्दा वाढदिवस आयपीएल 2020 मध्ये आले पण इतर चौघांचाही वाढदिवस त्यांच्या संघासाठी काही लकी ठरला नाही. त्यांना पराभव पत्करावा लागला. हार्दिक पांड्याच्या वाढदिवशी मात्र त्याचा संघ जिंकला. 

बेयरस्टोचा वाढदिवस 26 सप्टेंबरला होता त्यादिवशी ते केकेआरकडून सात गड्यांनी हरले. ख्रिस जाॅर्डनच्या वाढदिवशी 4 ऑक्टोबरला किंग्ज इलेव्हनला सीएसकेने 10 गड्यांनी दणका दिला. वाॕशिंग्टन सुंदरचा वाढदिवस 5 आॕक्टोबरला होता. त्यादिवशी राॕयल चॕलेंजर्सचा संघ दिल्लीकडून 59 धावांनी हरला. ब्राव्होचा वाढदिवस 7 ऑक्टोबरला होता. त्यादिवशी चेन्नईला केकेआरने 10 धावांनी मात दिली होती मात्र हार्दिकच्या वाढदिवशी मुंबईने दिल्लीवर पाच गड्यांनी विजय मिळवला. 

Web Title: Only Hardik Panda's birthday was 'Happy'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.