Join us  

इशानला एक न्याय, हार्दिक पांड्याला दुसरा; IPL खेळण्यासाठी 'रणजी' खेळणे बंधनकारक नाही

इशान किशन ( Ishan Kishan ) कुठे गायब झालाय... याचा शोध सध्या लागणे अवघड झालं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 4:07 PM

Open in App

इशान किशन ( Ishan Kishan ) कुठे गायब झालाय... याचा शोध सध्या लागणे अवघड झालं आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरून मानसिक थकवा असल्याचे सांगून इशान मायदेशात परतला तो कोणाच्या संपर्कातच नाही. भारतीय संघात परतण्यासाठी त्याला देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा अप्रत्यक्ष सल्ला मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दिला होता. पण, त्याकडे इशानने काणाडोळा केल्याचे पाहायला मिळाले. झारखंडच्या रणजी करंडक स्पर्धेतील पाच सामन्यांमध्ये इशान कुठेच दिसला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार तो मागील महिनाभर बडोदा येथील किरण मोरे यांच्या अकादमीत कृणाल व हार्दिक या पांड्या बंधुंसोबत आयपीएलसाठी तयारी करतोय. 

इशानच्या या वागण्याने संतापलेल्या BCCI ने आयपीएल खेळायची असेल तर रणजी करंडक स्पर्धेतील किमान २-३ सामने खेळा असा फतवा काढल्याचे समजतेय. इशानसह कृणाल पांड्या व दिपक चहर यांनाही हा सल्ला दिला गेला आहे. पण, यातून हार्दिक पांड्याला सूट दिली गेली आहे. तो सध्या पर्सनल ट्रेनिंग घेत आहे. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत झालेल्या दुखापतीनंतर तो आंतरराष्ट्रीय मालिकांना मुकलेला आहे आणि तो थेट आयपीएलमधून पुनरागमन करण्याचे बोलले जातेय. हार्दिकसाठी दुसरा न्याय का, असा सवाल जेव्हा BCCI अधिकाऱ्याला केला गेला, तेव्हा त्यांनी त्यामागचं कारण सांगितलं.

 एका अधिकाऱ्याने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, "आम्ही हार्दिक पांड्याचे प्रकरण समजू शकतो कारण त्याचे शरीर लाल-बॉल क्रिकेटची कठोरता स्वीकारू शकत नाही. तो कसोटी क्रिकेटचा भार सहन करू शकत नाही आणि टीम इंडियाला तो आयसीसी स्पर्धांसाठी तंदुरुस्त हवा आहे." .  

रोहितला कर्णधारपदावरून काढण्याचा Mumbai Indians चा निर्णय योग्य

''हे बघा, ही फ्रँचायझी नेहमी भविष्याचा विचार करून निर्णय घेते. रोहित शर्मा हा आता ३६ वर्षांचा झाला आहे आणि भारतीय संघाच्या तिन्ही फॉरमॅटचा तो कर्णधार असल्याने त्याच्यावर प्रचंड दडपण आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सने त्याच्यावरील दडपण कमी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि हार्दिक पांड्यासारख्या युवा खेळाडूच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे,''असे सुनील गावस्कर स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात म्हणाले. 

टॅग्स :इशान किशनहार्दिक पांड्याबीसीसीआयआयपीएल २०२३रणजी करंडक