Join us  

बीसीसीआयला फसवून त्यांनी केली ऑस्ट्रेलियन सफारी

भारतीय संघाबरोबर जवळपास 40 जणांचा ताफा होता. यामध्ये एका व्यक्तीने चक्क बीसीसीआयची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 6:50 PM

Open in App

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : खेळाडूंचे मानसीकत संतुलन चांगले असावे, यासाठी मोठ्या दौऱ्यावर त्यांच्या पत्नी किंवा मैत्रिणींनाही नेले जाते. बीसीसीआयनेही ही गोष्ट केली. भारतीय संघाबरोबर जवळपास 40 जणांचा ताफा होता. यामध्ये एका व्यक्तीने चक्क बीसीसीआयची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

परेदशातील दौऱ्यांमध्ये क्रिकेटपटूंबरोबर पत्नी किंवा मैत्रिणींना दोन आठवडे राहण्याची परवानगी बीसीसीआयने दिली होती. ही गोष्ट इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दौऱ्यासाठी कायम ठेवण्यात आली होती. यावेळी भारतीय संघात ज्यांचे स्थान कायम नाही, त्यांनीही आपल्या पत्नी किंवा मैत्रिणींना संघाबरोबर ठेवले होते. त्यामुळे एकूण 40 व्यक्ती बीसीसीआयच्या खर्चाने फिरत होत्या. बीसीसीआयसाठी पैसा ही समस्या नाही. पण तरीही पत्नी किंवा मैत्रिणींनी बीसीसीआयसाठी डोकेदुखी ठरत आहेत, असे वृत्त काही दिवसांपूर्वी ऐकिवात आले होते.

भारतीय खेळाडू आणि त्यांच्या पत्नी व पत्नी यावेळी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आले होते. त्यांच्याबरोबर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे सीओओ तुफान घोषदेखील ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेले होते. ऑस्ट्रेलियामध्ये खेळाडूंच्या व्यवस्थापनाबद्दल एक कार्यक्रम असल्याचे त्यांनी सांगितले होते. घोष हे भारतीय संघाबरोबर होते. त्याचबरोबर खेळाडूंबरोबर त्यांनी ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेचा आनंदही लुटला. त्यानंतर ते भारतात परतले. त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये खेळाडूंच्या व्यवस्थापनाचा कोणताही कार्यक्रम नसल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घोष यांनी बीसीसीआयची फसवणूक करून ऑस्ट्रेलियन सफारी केल्याचे म्हटले जात आहे.

भारताचा कर्णधार विराट कोहलीने बीसीसीआयकडे पत्नी किंवा मैत्रिणींनाही परदेश दौऱ्यात खेळाडूंबरोबर ठेवावे, अशी मागणी केली होती. बीसीसीआयने ही गोष्ट मान्य केली होती. त्यानुसार बीसीसीआयने परदेश दौऱ्यापूर्वी 10 दिवस पत्नी किंवा मैत्रिणींना खेळाडूंबरोबर राहण्याची मुभा दिली होती.

टॅग्स :बीसीसीआयभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया