Join us  

हजार फुटांवरून त्यानं सहकाऱ्याला फेकलं; शोएब अख्तरनं शेअर केला थरकाप उडवणारा Video

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर त्याचा बेताल विधानामुळे नेहमी चर्चेत असतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 1:37 PM

Open in App

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर त्याचा बेताल विधानामुळे नेहमी चर्चेत असतो. नुकतंच त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर टीका करताना या जागतिक संघटनेने गेल्या १० वर्षांत क्रिकेट संपविल्याचे म्हटले होते. इएसपीएन क्रिकइन्फोवर संजय मांजरेकरसोबत बोलताना शोएबने पांढऱ्या चेंडूंच्या क्रिकेटमधील काही नियमांवर नाराजी व्यक्त केली. मर्यादित षटकांचे क्रिकेट फलंदाजांसाठी अनुकूल बनविल्याचे शोएबने म्हटले आहे. अख्तर यानं गुरुवारी सोशल मीडियावर एक थरकाप उडवणारा व्हिडीओ पोस्ट केला. 

माजरेकर याच्याशी बोलताना तो सचिन तेंडुलकरबद्दल म्हणाला, ‘मी त्याच्याविरुद्ध कधीच आक्रमक होत नव्हतो. कारण जगातील या सर्वोत्तम फलंदाजासाठी माझ्या मनात आदर होता. पण, मी त्याच्या बॅटला लगाम घालण्याचा प्रयत्न करीत होतो. भारताच्या २००६ च्या पाकिस्तान दौºयादरम्यान सचिन टेनिस एल्बोमुळे संघर्ष करीत होता. मी त्याला बाऊंसर टाकले, पण त्यावेळी त्याला हूक किंवा पूलचे फटके लगावता आले नाहीत.’

अख्तरनं शेअर केलेल्या व्हिडीओत दोन पॅराग्लायडींग करणारे माणसं दिसत आहेत. हजारो फुटांवरून एक व्यक्ती त्याच्या सहकाऱ्याला घेऊन पॅराशूटसह खाली उतरला... ठराविक अंतर पार केल्यानंतर पॅराशूट घातलेल्या व्यक्तीनं त्याच्या सहकाऱ्याला खाली फेकलं... त्यानंतर जे घडलं ते तुम्हीच पाहा...

टीम इंडियाच्या माजी खेळाडूचा अपघात; गाडीची अवस्था पाहून उडेल थरकाप!

भाजपा खासदार गौतम गंभीरच्या वडिलांच्या गाडीची चोरी

सोशल अकाऊंटवरून पॉर्न क्लिप व्हायरल; पाकिस्तानी गोलंदाज ट्विटवर होतोय ट्रेंड!

हरभजन सिंगची मस्करी करणं विराट कोहलीला पडलं महाग; फिरकीपटूनं दिलं चॅलेंज

भारत मुद्दाम वर्ल्ड कपचा तो सामना हरला!; पाक क्रिकेटपटूच्या राजकारणाला बेन स्टोक्सचे सडेतोड उत्तर

टॅग्स :शोएब अख्तरसोशल व्हायरल