पाकिस्तानचान्यूझीलंड दौरा संकटात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेले पाकिस्तानचे आणखी तीन खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे ५३ सदस्यांपैकी कोरोना पॉझिटिव्ह खेळाडूंची संख्या १० इतकी झाली आहे. क्वारंटाईन नियम मोडल्यामुळे पाकिस्तानी संघाला आधीच न्यूझीलंड सरकारकडून फायनल वॉर्निंग मिळाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह खेळाडूंची संख्या वाढल्यानं आता त्यांना सरावावरही निर्बंध घातले गेले आहेत.
पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात तीन ट्वेंटी-20 आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका १८ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. पहिला कसोटी सामना २६ डिसेंबरपासून होणार आहे, तर चार दिवसीय सामना १० आणि १७ डिसेंबरला खेळवण्यात येणार आहे. पण, आता कोरोना पॉझिटिव्ह वाढत्या संख्येमुळे हा दौराच संकटात येण्याची चिन्हे आहेत.
क्वारंटाईनमध्ये असलेले खेळाडू एकमेकांना भेटताना व जेवण वाटताना दिसले होते, त्यामुळे न्यूझीलंडचे आरोग्य अधिकारी डॉक्टर अॅश्ली ब्लूमफिल्ड यांनी खेळाडूंचे कान टोचले होते. त्यांनी पाकिस्तान क्रिकेट मंडळाला अखेरची वॉर्निंग दिली होती आणि खेळाडूंकडून आणखी एक चूक झाल्यास त्यांना देशातून हद्दपार केले जाईल, असा इशाराही दिला होता.
पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे सीईओ वसीम खान यांनी खेळाडूंना काही सूचना केल्या आहेत. ते म्हणाले,''मी न्यूझीलंड सरकारशी चर्चा केली आणि तुन्ही तीन-चार वेळा आयसोलेशन नियमांचं उल्लंघन केल्याचे, त्यांनी सांगितले. कोरोना नियमासंदर्भात ते कोणताही गलथानपणा खपवून घेणार नाहीत आणि त्यांनी आपल्याला फायनल वॉर्निंग दिली आहे. तुमच्यासाठी ही आव्हानात्मक काळ आहे, हे मी समजू शकतो आणि अशाच परिस्थितीला तुम्ही इंग्लंडमध्ये सामोरे गेला आहात. पण, हा आपल्या देशाच्या इभ्रतीचा प्रश्न आहे. १४दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीचे काटेकोर पालन करा आणि त्यानंतर तुम्ही फ्री आहात. आणखी एक चूक आणि ते आपल्याला घरी पाठवतील.''
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड वेळापत्रकट्वेंटी-२० मालिका१८ डिसेंबर - ऑकलंड ( सकाळी ११.३० वा. पासून)२० डिसेंबर - हॅमिल्टन ( सकाळी ११.३० वा.पासून)२२ डिसेंबर - नेपियर ( सकाळी ११.३० वा. पासून) कसोटी मालिका२६ ते ३० डिसेंबर - माऊंट मौनगानुई ( पहाटे ३.३० वा. पासून)३ ते ७ जानेवारी २०२१ - ख्राईस्टचर्च ( पहाटे ३.३० वा. पासून)