Join us  

NZ vs IND : पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्या दिवसाचा खेळ थांबला, मराठमोळ्या अजिंक्यने दिवस गाजवला

अजिंक्यने यावेळी १२२ चेंडूंत चार चौकारांच्या जोरावर सर्वाधिक ३८ धावांची खेळी साकारली. अजिंक्य खालोखाल सलामीवीर मयांक अगरवालच्या नावावर ३४ धावा आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 10:11 AM

Open in App

वेलिंग्टन - पावसाच्या व्यत्ययामुळे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा खेळ थांबवण्यात आला. त्यामुळे पहिल्या दिवसअखेर भारताने ५५ षटकांत ५ बाद १२२ अशी मजल मारली आहे.

भारताच्या फलंदाजांना यावेळी अपेक्षित कामगिरी करता आली नाही. पण या गोष्टीला अपवाद ठरला तो मराठमोळा अजिंक्य रहाणे. कारण भारतीय संघाची पडझड सुरु असताना त्याने एक बाजू लावून धरली. त्यामुळेच भारतीय संघावरील आपत्ती टळली. अजिंक्यने यावेळी १२२ चेंडूंत चार चौकारांच्या जोरावर सर्वाधिक नाबाद ३८ धावांची खेळी साकारली. अजिंक्य खालोखाल सलामीवीर मयांक अगरवालच्या नावावर ३४ धावा आहेत.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशीच पावसाने खोडा घातल्याचे पाहायला मिळाले. दुसऱ्या सत्राचा खेळ संपल्यानंतर पाऊस सुरु झाला आणि त्यामुळे तिसऱ्या सत्राच्या खेळाला अजूनही सुरुवात होऊ शकली नाही.

पहिल्या सत्रात भारताने तीन विकेट्स गमावल्या होत्या. दुसऱ्या सत्रातही भारताला दोन फलंदाज गमवावे लागले. पण मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने मात्र भारताच डाव सावरला.

भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या सत्रात २८ षटकांत ३ बाद ७९ अशी मजल मारली होती. दुसऱ्या सत्रातील सातव्या षटकातच भारताला सलामीवीर मयांक अगरवालच्या रुपात मोठा धक्का बसला होता. त्यानंतर हनुमा विहारीलाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळे भारताला दुसऱ्या सत्राअखेरीस ५५ षटकांत ५ बाद १२२ अशी मजल मारता आली होती.

Virat Kohliच्या नावावर झाला नकोसा विक्रम; धोनी आहे यादीमध्ये अव्वलन्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीला फक्त दोन धावाच करता आल्या. त्यामुळे धोनीच्या नावावर एक नकोसा विक्रम झाल्याचे पाहायला मिळत आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या सत्रात भारताला तीन धक्के बसले. त्यामुळे पहिल्या डावातील २८ षटकांत भारताला उपहारापूर्वी ३ बाद ७९ अशी मजल मारता आली. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली आणि भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. न्यूझीलंडचा हा निर्णय योग्य असल्याचे पहिल्या सत्रात दिसले. कारण न्यूझीलंडने पहिल्या सत्रात भारताच्या तीन फलंदाजांना बाद केले.

गेल्या काही महिन्यांमध्ये कोहली चांगल्या फॉर्मात नसल्याचे म्हटले जात आहे. कारण आतापर्यंत न्यूझीलंडच्या दौऱ्यात तरी कोहलीला लौकिकाला साजेशी फलंदाजी करता आलेली नाही. काही जणांच्या मते कोहलीचा हा बॅडपॅच सुरु आहे. कारण आतापर्यंत ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांत कोहलीला छाप पाडता आलेली नाही. त्यामुळे आता कसोटी क्रिकेटमध्ये कोहली सर्व कसर भरून काढेल, असे वाटत होते. पण कोहली फक्त दोन धावांवरच बाद झाला.

न्यूझीलंडच्या दौऱ्यावर कोहली पहिल्यांदाच कर्णधार म्हणून गेला आहे. कर्णधार म्हणून न्यूझीलंडमध्ये कसोटी सामन्यात पहिल्यांदा खेळताना कोहलीला दोन धावा करता आल्या. हा आतापर्यंत भारतीय कर्णधारांचा निच्चांक आहे. कारण यापूर्वी सौरव गांगुलीने न्यूझीलंडमध्ये कर्णधार म्हणून कसोटी सामन्यात पहिल्यांदा खेळताना दोन धावा केल्या होत्या. नवाब पतौडी यांनी ११, सुनील गावस्कर यांनी नाबाद ३५, बिशनसिंग बेदी यांनी ३०, मोहम्मद अझरने ३०, वीरेंद्र सेहवागने २२ धावा केल्या होत्या. पण या यादीमध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी अव्वल स्थानावर आहे. धोनीने न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदा खेळताना ४७ धावा केल्या होत्या.

टॅग्स :अजिंक्य रहाणेभारत विरुद्ध न्यूझीलंडमयांक अग्रवालविराट कोहली