Join us
Daily Top 2Weekly Top 5

NZ vs PAK Test : भर मैदानावर फॅन्सने काढले पाकिस्तानचे वाभाडे; न्यूझीलंड कसोटीमधील फोटो व्हायरल

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातल्या बॉक्सिंग डे कसोटी दरम्यान फॅन्सच्या मजेशीर फलकांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.

By स्वदेश घाणेकर | Updated: December 29, 2020 12:51 IST

Open in App

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातल्या बॉक्सिंग डे कसोटी दरम्यान फॅन्सच्या मजेशीर फलकांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. खेळाडूंकडून झालेल्या चुकांचा पाढाच या फॅननं सर्वांसमोर मांडून पाकिस्तानी संघाचे जाहीर वाभाडे काढले. गचाळ क्षेत्ररक्षण, झेल सोडणे याचा हिशेबच चाहत्यानं मांडला आणि कॅमेरामननं तो टिपून जगजाहीर केला. 

केन विलियम्सनच्या ( १२९) शतकाच्या आणि रॉस टेलर ( ७०), हेन्री निकोल्स ( ५६) व बी जे वॉटलिंग ( ७३) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर न्यूझीलंडनं पहिल्या डावात ४३१ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा पहिला डाव २३९ धावांवर गडगडला. न्यूझीलंडनं दुसरा डाव ५ बाद १८० धावांवर घोषित करून पाकिस्तानसमोर ३७३ धावांचे लक्ष्य ठेवले. चौथ्या दिवसअखेर पाकिस्तानच्या ३ बाद ७३ धावा झाल्या आहेत. 

पण, या पोस्टरनं सर्वांचे लक्ष वेधले आहे.

टॅग्स :पाकिस्तानन्यूझीलंड