Join us  

न्यूझीलंडच्या महिला फलंदाजाचा विक्रम; पुरुष क्रिकेटपटूला जमला नाही 'हा' पराक्रम

न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघानं सोमवारी दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाविरुद्धच्या चौथ्या ट्वेंटी-20 सामन्यात विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 11:48 AM

Open in App

न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघानं सोमवारी दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाविरुद्धच्या चौथ्या ट्वेंटी-20 सामन्यात विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंडनं 5 सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली. न्यूझीलंडच्या 2 बाद 172 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ 17 षटकांत 102 धावांवर माघारी परतला. सोफी डेव्हीननं या सामन्यात दमदार शतकी खेळी करताना न्यूझीलंडच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. गोलंदाजीतही डेव्हीननं एक विकेट घेतली. न्यूझीलंडनं हा सामना 69 धावांनी जिंकला. या सामन्यात डेव्हीननं केलेला विक्रमाची नोंद ही आतापर्यंत पुरुष किंवा महिला खेळाडूला जमलेली नाही.

प्रथम फलंदाजी करताना डेव्हीन आणि लॉरेन डॉन यांना साजेशी सुरुवात करता आली नाही. लॉरेल ( 11) चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतली. त्यानंतर डेव्हीन आणि सुझी बेट्स यांनी तुफान फटकेबाजी केली. या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. बेट्सनं 46 चेंडूंत 3 चौकारांसह 47 धावा केल्या. डेव्हीननं 65 चेंडूंत 12 चौकार व 3 षटकार खेचून 105 धावांची खेळी केली. ट्वेंटी-20 तील तिचे हे पहिलेच शतक ठरलं. या फटकेबाजीनंतर डेव्हीननं गोलंदाजीतही कमाल दाखवली. तिनं एक षटक टाकून 6 धावांत एक विकेट घेतली. न्यूझीलंडच्या अॅना पीटरसननं सर्वाधिक तीन, जेस केरनं दोन विकेट्स घेतल्या.

महिला ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात शतक आणि विकेट घेणारी डेव्हीन ही चौथी खेळाडू ठरली. तिनं या सामन्यात 105 धावा आणि 1 विकेट घेतली. यापूर्वी वेस्ट इंडिजची डेंड्रा डॉटीननं 2010मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 112* धावा व 1 ( 20 धावा) विकेट, नेदरलँड्सच्या स्टेरे कॅलीसनं 2019मध्ये जर्मनीविरुद्ध 126* धावा व 2 ( 11धावा) विकेट्स आणि श्रीलंकेची चमारी अटापट्टूनं 2019मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 113 धावा व 1 ( 53 धावा) विकेट अशी कामगिरी केली होती. 

या सामन्यात डेव्हीननं दुसऱ्या विकेटसाठी बेट्सस 142 धावांची भागीदारी केली. महिला ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये न्यूझीलंडमधील ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी हा विक्रम मार्टीन व सॅथरवेट ( न्यूझीलंड) वि. वेस्ट इंडिज, 124 धावा यांच्या नावावर होता. न्यूझीलंडकडून झालेली ही तिसरी सर्वोत्तम भागीदारी आहे. बेट्स आणि डेव्हीन यांनी 2018मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 182 धावांची भागीदारी केली होती. महिला ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये एकाच मालिकेत सर्वाधिक धावांचा विक्रमही डेव्हीननं नावावर केला. तिनं या मालिकेत 297 धावा केल्या. यासह तिनं ऑस्ट्रेलियाच्या ( 2014 साली) मेग लॅनिंगचा 257 धावांचा विक्रम मोडला.  

 पुरुष व महिला क्रिकेटपटूला न जमलेला पराक्रमडेव्हीननं सलग पाच ट्वेंटी-20 सामन्यांत 50+ धावा केल्या आहेत. पुरुष किंवा महिला क्रिकेटपटूला सलग चार सामन्यांत अर्धशतकी किंवा त्यापेक्षा अधिक धावा करता आल्या आहेत. डेव्हीननं सलग पाच सामन्यांत ( 72, 54*, 61, 77, 105 ) अर्धशतकी खेळी केली आहे. 

तिसऱ्या वन डेसाठी न्यूझीलंड संघात दोन बदल; प्रमुख खेळाडूची वापसी

ध्रुव जुरेलची महेंद्रसिंग धोनी स्टाईल 'स्टम्पिंग'; नेटिझन्सकडून कौतुक

विजयाच्या उन्मादात बांगलादेशच्या खेळाडूंकडून टीम इंडियाच्या खेळाडूंना धक्काबुक्की, Video

अजिंक्य रहाणेची शतकी खेळी, टीम इंडियाचे न्यूझीलंडला चोख प्रत्युत्तर 

World Cup बाबत आयसीसीचा मोठा निर्णय; भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलियाला फटका? 

टॅग्स :न्यूझीलंडद. आफ्रिका