हर्षा भोगले लिहितात...
संघाचा समतोल साधताना एकाला संधी देणे म्हणजे दुस-याच्या भूमिकेवर कात्री चालविण्याप्रमाणे असते. प्रत्येक संघात हेच घडत असते आणि योग्य समतोल साधण्यासाठी प्रयोग करावे लागतात.
इंदूरमध्ये हार्दिक पांड्याला चौथ्या क्रमांकावर खेळविणे रणनीतीचा भाग वाटले आणि संघात अनेकदा असे प्रयोग केले जातात. त्यामुळे दोन खेळाडूंच्या क्रमांकामध्ये बदल झाला, पण वेळेची गरज ओळखून हा निर्णय योग्यच वाटला.
बेंगळुरुमध्ये पांड्या पुन्हा चौथ्या क्रमांकावर खेळायला आला त्यावेळी हा निर्णय मात्र रणनीतीचा भाग वाटला नाही. प्रतिभावान युवा खेळाडू ती भूमिका बजावण्यास सक्षम असेल तर त्याच्याकडे मोठी जबाबदारी सोपविण्यास काहीच हरकत नाही.
प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास पांड्याची आगेकूच सध्या योग्य दिशेने सुरू आहे. त्याच्या अनेक चाचण्या झाल्यानंतरच तो किती सक्षम आहे, याची कल्पना येईलच. मनीष पांडेबाबत विचार करता मनाला चटका लावून जाते, पण या पातळीवर खेळताना कुठल्याही क्षणी तुमची शिकण्याची तयारी असावी लागते. त्यामुळे धोनीला सातव्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागली. तो सुरुवातीला हीच भूमिका बजावत होता. माझ्या मते धोनी आता आधारस्तंभ म्हणून अधिक भूमिका बजावू शकतो. दर्जेदार फलंदाजांची फळी असलेल्या संघात सातव्या क्रमांकावर स्फोटक फलंदाज आवश्यक आहे. यासाठी पांड्या किंवा जाधव योग्य आहेत. पाचव्या क्रमांकासाठी धोनीपेक्षा दुसरा चांगला असूच शकत नाही. धोनी जम बसवून विजय साकारण्यास सक्षम आहे.
पांड्याच्या विकासासाठी धोनीचा अडथळा निर्माण होणार नाही आणि धोनीलाही सर्वोत्तम खेळी करता येईल. भारतीय संघ नागपूमध्ये ही समस्या सोडविण्यात यशस्वी ठरेल, अशी आशा आहे. (पीएमजी)