Najam Sethi: आता पाकिस्तान क्रिकेटचे अच्छे दिन येणार! PCB च्या नवनिर्वाचित अध्यक्षांचा मोठा दावा

पाकिस्तान क्रिकेट टीमचा मायदेशातच दारुण पराभव झाला. कर्णधार बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाला ०-३ ने कसोटी मालिका गमवावी लागली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 03:19 PM2022-12-22T15:19:15+5:302022-12-22T15:25:17+5:30

whatsapp join usJoin us
Now the good days of Pakistan cricket will come A big claim by the newly elected chairman of PCB Najam Sethi | Najam Sethi: आता पाकिस्तान क्रिकेटचे अच्छे दिन येणार! PCB च्या नवनिर्वाचित अध्यक्षांचा मोठा दावा

Najam Sethi: आता पाकिस्तान क्रिकेटचे अच्छे दिन येणार! PCB च्या नवनिर्वाचित अध्यक्षांचा मोठा दावा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पाकिस्तान क्रिकेट टीमचा मायदेशातच दारुण पराभव झाला. कर्णधार बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाला ०-३ ने कसोटी मालिका गमवावी लागली. यानंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बदल करण्यास सुरूवात केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने रमीझ राजा यांची पीसीबी अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली.  दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी नजम सेठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नजम सेठी यांनी ट्विट करुन पाकिस्तान क्रिकेटला चांगले दिवस येणार असल्याचा दावा केला आहे.  

रमीझ राजा यांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट राजवट नाही. 2014 ची PCB घटना पुनर्संचयित झाली आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटचे पुनरुज्जीवन करण्यासाठी व्यवस्थापन समिती प्रयत्न करेल. हजारो क्रिकेटपटूंना पुन्हा रोजगार मिळेल. क्रिकेटमधला दुष्काळ संपेल, असं ट्विट नजम सेठी यांनी केले आहे. 

PCBला मिळाला नवा अध्यक्ष 

दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी नजम सेठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पीसीबीचे मावळते अध्यक्ष रमीझ राजा यांनी बीसीसीआयला इशारा देत भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती. जर भारतीय संघ आगामी आशिया चषकासाठी पाकिस्तानात आला नाही तर पाकिस्तानी संघ देखील भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकावर बहिष्कार टाकेल अशी धमकी राजा यांनी दिली होती. यानंतर त्यांनी मवाळ भूमिका घेत भारत आणि पाकिस्तान यांची कसोटी क्रिकेटला गरज असल्याचे त्यांनी म्हटले होते.

Ramiz Raja: भारताला धमकावणाऱ्या रमीझ राजाची हकालपट्टी; PCBला मिळाला नवा अध्यक्ष 

2023 मध्ये होणाऱ्या प्रमुख स्पर्धा 

- आयसीसी महिला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप, दक्षिण आफ्रिका
- आयसीसी 19 वर्षांखालील मुलींची ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा, दक्षिण आफ्रिका
- आशिया चषक 2023, पाकिस्तान
- आयसीसी क्रिकेट वन डे वर्ल्ड कप, भारत
 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: Now the good days of Pakistan cricket will come A big claim by the newly elected chairman of PCB Najam Sethi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.