Join us  

विराट कोहली नव्हे तर 'हा' आहे भारतीय संघातील तंदुरुस्त खेळाडू

गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेट संघात तंदुरुस्तीचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे संघात निवड होण्यासाठी प्रत्येक खेळाडूला ' यो-यो' टेस्ट द्यावी लागत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2018 9:05 AM

Open in App

मुंबई : गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेट संघात तंदुरुस्तीचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे संघात निवड होण्यासाठी प्रत्येक खेळाडूला ' यो-यो' टेस्ट द्यावी लागत आहे. त्यात नापास झालेल्यांना संघात स्थान मिळत नाही. मग तुम्ही कितीही चांगली कामगिरी केली का असेना, तंदुरुस्ती फार महत्त्वाची. त्यामुळेच कर्णधार विराट कोहलीलाही ही टेस्ट द्यावी लागली. 

विराट हा संघातील सर्वात तंदुरुस्त खेळाडू म्हणून ओळखला जातो. मात्र, संघात त्यापेक्षाही अधिक तंदुरुस्त खेळाडू आहे, असे सांगितल्यास तुम्हाला आश्चर्य वाटायला नको. भारतीय संघाचे ट्रेनर शंकर बासू यांच्या सांगण्यानुसार करूण नायर हा संघातील सर्वात तंदुरुस्त खेळाडू आहे. 

" बासू सर आणि संजय बांगर सर यांच्याकडून मी बऱ्याच टिप्स घेतल्या. खूप मेहनत घेतली. तंदुरुस्तीसाठी बासू सरांशी सातत्याने चर्चा केली. त्यांच्यानुसार मी संघातील सर्वात तंदुरुस्त खेळाडू आहे. याचा मला अभिमान आहे आणि यात आणखी सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील आहे," असे नायरने एका इंग्रजी वेबसाईटला सांगितले. 

टॅग्स :विराट कोहलीबीसीसीआय