Join us  

भारतीय निवडकर्ते काय विचार करत असतील याचा विचार करत नाही - पृथ्वी शॉ

भारतीय निवड समितीकडून सातत्याने दुलर्क्षित राहिलेला पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याने देशांतर्गत क्रिकेट गाजवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 1:13 PM

Open in App

भारतीय निवड समितीकडून सातत्याने दुलर्क्षित राहिलेला पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याने देशांतर्गत क्रिकेट गाजवले. सध्या तो इंग्लंडमध्ये वन डे - चषक स्पर्धेत खेळतोय आणि त्याने काल लिस्ट ए क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावले आणि इंग्लिश वन डे कप स्पर्धेतील सर्वोत्तम वैयक्तिक खेळी करणाऱ्या फलंदाजांमध्ये सहावे स्थान पटकावले. नॉर्थएम्पटनशायर क्लबकडून खेळणाऱ्या पृथ्वीने १५३ चेंडूंत २४४ धावांची खेळी करून सोमरसेट संघाची धुलाई केली. त्याच्या या फटकेबाजीत २८ चौकार व ११ षटकारांचा समावेश होता आणि संघाने ८ बाद ४१५ धावांचा डोंगर उभा केला.

जुलै २०२१ पासून पृथ्वी शॉ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्यानंतर मैदानावरील कामगिरीसोबत पृथ्वी वैयक्तिक आयुष्य अन् वादांमुळेही चर्चेत राहिला. पण, सध्या त्याने वर्तमानावर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्धार केला आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये पृथ्वीचे हे दुसरे द्विशतक  ठरले आहे. यापूर्वी त्याने २०२०-२१ मध्ये विजय हजारे ट्रॉफीत पुद्दुचेरीविरुद्ध द्विशतकी खेळी केली होती. रोहित शर्मा ( ३) याच्यानंतर लिस्ट ए क्रिकटमध्ये एकापेक्षा अधिक द्विशतक झळकावणारा पृथ्वी हा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. रोहितने २०१३ ( वि. ऑस्ट्रेलिया), २०१४ ( श्रीलंका) आणि २०१७ ( श्रीलंका) असे तीन द्विशतकं झळकावली आहेत.

पृथ्वीच्या फटकेबाजीच्या जोरावर संघाने ८७ धावांनी निर्णायक विजय मिळवला. पृथ्वी म्हणाला, "सूर्य मावळला होता, वळजवळ भारतीय हवामानासारखे वाटले. मला वाटले की हा दिवस माझ्यासाठी आहे. तुम्हाला कधीकधी भाग्यवान व्हावे लागेल, म्हणून मला वाटते की हा दिवस माझ्यासाठी होता मी. २२७ धावा माझ्या डोक्यात होत्या. मी व्हाईटीला याबद्दल सांगितले. माझे लक्ष नेहमी संघाच्या यशावर असते. मी नेहमी वैयक्तिक टप्प्यांपेक्षा संघाला प्राधान्य देतो. जर माझ्या स्कोअरमुळे माझ्या संघाच्या संधी वाढू शकतात, तर मी तसा खेळ करत राहण्याचा ध्येय ठेवतो."

विक्रमी खेळी नंतर पृथ्वी म्हणाला, तो म्हणाला, "भारतीय निवडकर्ते काय विचार करत असतील याचा विचार करत नाही, पण मला फक्त येथे चांगला वेळ घालवायचा आहे... नॉर्थम्प्टनशायरने मला ही संधी दिली आहे... मी त्याचा आनंद घेत आहे."   

टॅग्स :पृथ्वी शॉकौंटी चॅम्पियनशिप
Open in App