Join us

IPL 2020: आयपीएलमध्ये नव्वदीपार नॉटआऊट, कोण आहेत या यादीतील क्रिकेटर

आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून खेळत असलेला विराट आतापर्यंत तीन वेळा ९० च्या पुढे जाऊन देखील नाबाद राहिला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 18:08 IST

Open in App

आयपीएलच्या चेन्नई विरोधातील सामन्यात कर्णधार विराट कोहलीला सूर गवसला. आयपीएलच्या पहिल्या सामन्यापासून तो काहीसा अडखळत खेळत होता. मात्र सीएसकेविरोधात त्याने दणदणीत खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावरच आरसीबीने विजय मिळवला.  त्यासोबत विराटने आणखी एक  विक्रम केला आहे. ९० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करून नाबाद राहण्याचा विक्रम. 

आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून खेळत असलेला विराट आतापर्यंत तीन वेळा ९० च्या पुढे जाऊन देखील नाबाद राहिला आहे. त्याने याबाबतीत शिखर धवनच्या विक्रमाची बरोबरी केली. धवन देखील तीन वेळा नव्वदीपार जाऊन नाबाद राहिला आहे. त्यासोबतच ख्रिस गेल हा दोन वेळा अशाच पद्धतीने नाबाद राहिला आहे. त्यासोबच विरेंद्र सेहवाग, शेन वॉटसन, जोश बटलर, डेव्हिड वॉर्नर यांनीही ही कामगिरी दोन वेळा केली आहे.

९० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करूनही प्रत्येकी एक वेळा नाबाद राहणाऱ्यांच्या यादीत नमन ओझा, सुरेश रौना, महेला जयवर्धने, दिनेश कार्तिक, कोरे अँडरसन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, गौतम गंभीर,ख्रिस लीन, वृद्धीमान साहा, श्रेयस अय्यर, संजु सॅमसन, जेसन रॉय, ए.बी. डिव्हिलियर्स आणि के.एल. राहुल यांचा समावेश आहे.

टॅग्स :IPL 2020