Join us  

२००७मध्ये जोगिंदरला शेवटचे षटक देण्याचा निर्णय MS Dhoni चा नव्हता - युवराज सिंग

भारत-पाकिस्तान यांच्यातली २००७ मधील ट्वेंटी-२० फायनल आजही सर्वांच्या लक्षात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2023 4:57 PM

Open in App

भारत-पाकिस्तान यांच्यातली २००७ मधील ट्वेंटी-२० फायनल आजही सर्वांच्या लक्षात आहे. पाकिस्तानला अखेरच्या षटकात विजयासाठी १३ धावांची गरज असताना नवख्या जोगिंदर शर्माकडे चेंडू सोपवला गेला अन् त्याने मिसबाह उल हकची विकेट मिळवून देताना भारताला ऐतिहासिक जेतेपद पटकावून दिले. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला वहिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला होता. जोगिंदरला शेवटचे षटक देण्याचा निर्णय हा धोनीचा मास्टरस्ट्रोक ठरला. आतापर्यंत हा निर्णय धोनीचाच असल्याचे समजून त्याला भरपूर श्रेय दिले गेले, परंतु भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याचं म्हणणं काही वेगळं आहे. 

MS Dhoni आणि मी काही जवळचे मित्र नाही, अनेकवेळा त्याने...; युवराज सिंग हे काय बोलून गेला?

भारताच्या ५ बाद १५७ धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानने १९ षटकांत ९ बाद १४५ धावा केल्या होत्या. तेव्हा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग याच्याऐवजी धोनीने चेंडू जोगिंदरच्या हाती दिला. पहिला चेंडू वाईड, दुसरा निर्धाव अन् तिसऱ्यावर षटकार खेचल्यानंतर टीम इंडिया दडपणात होती. आता ४ चेंडूंत ६ धावाच त्यांना करायच्या होत्या अन् मिसबाह उल हक स्ट्राईकवर होता. जोगिंदरच्या तिसऱ्या चेंडूवर मिसबाहने स्कूप मारला अन् शॉर्ट फाईन लेगवरून चेंडू उत्तुंग उडाला. पण, श्रीसंतने सोपा झेल घेतला अन् भारताने ५ धावांनी सामना जिंकला. 

रणवीर अल्लाहबादीयाच्या पॉडकास्टवर युवराजने सांगितले की, खरं सागायचं तर जोगिंदरला शेवटचे षटक टाकण्याचा निर्णय हा भज्जीचा होता. हरभजन सिंग अनुभवी होता आणि धोनीने त्याच्या गोलंदाजीसाठी तशी फिल्डिंग सेट केली होती. तेव्हा भज्जी म्हणाला, ''मी मिसबाहला एक षटक टाकलं आहे आणि त्याने मला तीन खणखणीत षटकार खेचले. त्यामुळे हे षटक जोगिंदरला द्यायला हवं.'' हरभजन सिंगने धोनीला ही कल्पना दिली.  

MS Dhoni आणि मी काही जवळचे मित्र नाही युवराज म्हणाला की, माही आणि मी जवळचे मित्र नाही. क्रिकेटमुळे आम्ही मित्र होतो. माहीची जीवनशैली वेगळी आणि माझी वेगळी. अशा परिस्थितीत आम्ही कधीच जवळचे मित्र नव्हतो. जेव्हा मी आणि माही मैदानात होतो तेव्हा आम्ही दोघांनीही १०० टक्के दिले. तो कर्णधार आणि मी उपकर्णधार. जेव्हा तो संघात आला तेव्हा मी ४ वर्षांनी सीनियर होतो. पण, जेव्हा दुसरा कर्णधार बनतो आणि तुम्ही उपकर्णधार बनता तेव्हा दोघांमधील निर्णयांमध्ये मतभेद होतात. 

टॅग्स :युवराज सिंगमहेंद्रसिंग धोनीट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२हरभजन सिंग