Join us

कोणासमोरही स्वत:ला सिद्ध करण्याची गरज नाही - विराट कोहली

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने मायदेशासह परदेशातही खोऱ्याने धावा केल्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 03:40 IST

Open in App

अ‍ॅडिलेड : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने मायदेशासह परदेशातही खोऱ्याने धावा केल्या. भारतीय फलंदाज परदेशातही धावांचा पाऊस पाडू शकतो, असा आत्मविश्वास त्याने अन्य सहकाºयांमध्ये निर्माण केला आहे. त्याच आत्मविश्वासाने भारतीय संघ आॅस्ट्रेलिया दौºयात चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे. भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना ६ डिसेंबरपासून अ‍ॅडिलेड येथे खेळवण्यात येणार आहे. याही कसोटी मालिकेत कोहलीकडून फार अपेक्षा आहेत. मात्र, कोणासमोरही स्वत:ला सिद्ध करण्याची गरज नसल्याने कोहलीला वाटते. मैदानावर शंभर टक्के योगदान देण्यासाठी सज्ज असल्याचे त्याने सांगितले.‘‘प्रत्येक मालिकेतून तुम्हाला शिकावं लागतं. प्रत्येक दौरा आणि सामना हा आपली कसोटी पाहणारा असतो. आॅस्ट्रेलियाच्या मागील दौºयात मी चोख कामगिरी करून दाखवली आहे. त्यामुळे मला या दौºयात कोणासमोर स्वत:ला सिद्ध करण्याची काहीच गरज नाही,’’ असे मत कोहलीने सिडनीतील एका रेडिओ चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले. तो म्हणाला, ‘‘माझ्याकडून संघाला काय अपेक्षित आहे, ते माझे लक्ष्य आहे. मी मैदानावर शंभर टक्के योगदान देण्यासाठी सज्ज आहे. हे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे या मालिकेतही माझा तोच प्रयत्न असेल.’’भारतीय संघ आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी अ‍ॅडिलेड येथे दाखल झाला आहे. भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी ६ ते १० डिसेंबर या कालावधीत अ‍ॅडलेड ओव्हल येथे खेळवण्यात येणार आहे. ेंटी-२० मालिकेतील बरोबरीनंतर भारतीय संघ सराव सामन्यासाठी सिडनीतच मुक्कामाला होता.दरम्यान, क्रिकेट आॅस्ट्रेलिया एकादश संघाविरुद्धच्या सराव सामना भारताने अनिर्णीत राखला. अरच्या दिवशी मुरली विजयने १२९ धावांची खेळी केली. लोकेश राहुलनेही ६२ धावा करताना सूर सापडल्याचा दिलासा दिला. भारताने हा सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळवले. भारताने दुसºया डावात २ बाद २११ धावा करून सामना अनिर्णीत सोडवला.>पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ अ‍ॅडिलेड येथे दाखल. शंभर टक्के योगदान देण्याचा कोहलीचा निर्धार.६ डिसेंबरपासून होणार पहिल्या सामन्याला सुरुवात.

गोलंदाजांमध्ये कोहलीवर वर्चस्व गाजविण्याची क्षमता : पेनआमच्या वेगवान गोलंदाजांमध्ये पुरेशी क्षमता असून ते भारताचा कर्णधार विराट कोहलीवर वर्चस्व गाजवू शकतात, असा विश्वास आॅस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने व्यक्त केला. त्याचसोबत ६ डिसेंबरपासून अ‍ॅडिलेडमध्ये प्रारंभ होणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत अधिक भावुक होण्याची गरज नाही, असे आवाहनही पेनने आॅस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांना केले आहे. आमचे वेगवान गोलंदाज जर लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात यशस्वी ठरले तर ते कोहलीला अडचणीत आणू शकतात.>आश्विनच्या आव्हानाला सामोरेजाण्यासाठी नील्सनची मदत घेणार : हेडडावखुरा आॅस्ट्रेलियन फलंदाज ट्रॅव्हिस हेडने ६ डिसेंबरपासून प्रारंभ होत असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतीय आॅफस्पिनर रविचंद्रन आश्विनच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी संघातील ज्युनिअर सहकारी हॅरी नील्सनची मदत घेणार आहे. हॅरी नील्सनने सराव सामन्यात त्याच्याविरुद्ध चांगला खेळ केला. त्याच्यासोबत चर्चा करण्यासाठी उत्सुक आहे.’ आश्विनला कारकिर्दीत डावखुºया फलंदाजांविरुद्ध विशेष यश मिळाले आहे. अंतिम ११ खेळाडूंमध्ये किमान चार डावखुºया फलंदाजांना स्थान मिळण्याची शक्यता आहे. आमचे फलंदाज भारताच्या आव्हानाला सामोरे जाण्यास सज्ज असल्याचे हेड म्हणाला.>अ‍ॅडिलेडच्या खेळपट्टीवर थोडी हिरवळ असेल : क्युरेटरभारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यादरम्यानच्या पहिल्या सामन्याचे यजमानपद भूषविणाºया अ‍ॅडिलेड मैदानावरील क्युरेटर डॅमियन हॉग यांनी खेळपट्टीवर थोडी हिरवळ ठेवली असल्याचे म्हटले आहे. गेल्या तीन मोसमात येथे दिवस-रात्र कसोटी सामने खेळले गेले होते. त्यामुळे पहिला कसोटी सामना केवळ तीन दिवसांत, दुसरा चार दिवसांपर्यंत आणि तिसरा पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रापर्यंत चालला होता. दिवस-रात्र कसोटीत गुलाबी चेंडूची चमक कायम राखण्यासाठी अतिरिक्त हिरवळ ठेवण्यात आली होती.

टॅग्स :विराट कोहली