Join us  

करारबद्ध खेळाडूंसाठी सराव शिबिर नाही - बीसीसीआय

गृहमंत्रालयाने रविवारी जाहीर केलेल्या ननव्या निर्देशानुसार ३१ मेपर्यंत लॉकडाऊनचा चौथा टप्पा वाढविण्यात आला. नव्या निर्देशात खेळाडूंना क्रीडांगण आणि स्टेडियममध्ये सरावास परवानगी असेल मात्र प्रेक्षक उपस्थित राहणार नाहीत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 4:51 AM

Open in App

नवी दिल्ली : क्रीडा परिसर आणि स्टेडियममध्ये गर्दी टाळून सराव करण्याची परवानगी मिळाल्यानंतरही भारतीय क्रिकेट बोर्डाने(बीसीसीआय) करारबद्ध खेळाडूंसाठी शिबिराचे आयोजन न करण्याचे ठरवले आहे. याउलट लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात राज्य संघटनांच्या सहकार्याने स्थानिक स्तरावर सरावाचे आयोजन करण्याची योजना आहे.गृहमंत्रालयाने रविवारी जाहीर केलेल्या ननव्या निर्देशानुसार ३१ मेपर्यंत लॉकडाऊनचा चौथा टप्पा वाढविण्यात आला. नव्या निर्देशात खेळाडूंना क्रीडांगण आणि स्टेडियममध्ये सरावास परवानगी असेल मात्र प्रेक्षक उपस्थित राहणार नाहीत. यानुसार खेळाडू वैयक्तिक सराव करू शकतात, असे संकेत मिळाले. कोरोना महामारीमुळे भारतात आतापर्यंत ३ हजार बळी गेले असून ९५ हजारावर लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. जगभरात कोरोनामुळे ३ लाख १५ हजार बळी गेले तर कोरोनाबाधितांची संख्या ४७ लाख इतकी झाली आहे.बीसीसीआय कोषाध्यक्ष अरुण धूमल यांनी सोमवारी उशिरा रात्री एक प्रसिद्धिपत्रक काढले. त्यात ते म्हणतात,‘ विमानसेवा आणि इतर प्रवासावर ३१ मे पर्यंत स्थगिती असल्यामुळे बीसीसीआयने आपल्या करारबद्ध खेळाडूंसाठी कौशल्यावर आधारित सरावासाठी प्रतीक्षा करण्याचे धोरण अवलंबले आहे. खेळाडू स्थानिक स्तरावर सराव करण्यास इच्छुक असतील तर संबंधित राज्य संघटनांसोबत बोलून त्यांना सरावाची संधी उपलब्ध क रून दिली जाईल.’दरम्यान,‘बीसीसीआय विविध राज्यांच्या दिशानिर्देशांचा अभ्यास करेल. त्यानुसार राज्य संघटनांच्या समन्वयातून कौशल्य ाधारित सरावासाठी कार्यक्रम तयार केला जाइल. बीसीसीआय पदाधिकारी संघ व्यवस्थापनासोबत संवाद कायम ठेवतील.परिस्थिती सुधारताच संपूर्ण संघासाठी उपयुक्त योजना अंमलात आणतील, असे धुमल यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)खेळाडूंची सुरक्षा सर्वतोपरीधुमल यांच्यानुसार, ‘खेळाडूंची सुरक्षा सर्वतोपरी आहे. खेळाडू आणि सहयोगी स्टाफ यांची आरोग्य आणि निवास व्यवस्था करण्यास आमचे प्राधान्य असेल. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना खीळ बसेल, असा कुठलाही निर्णय अतिघाइने आम्ही घेणार नाही. सरकारचे आदेश पाळूनच क्रिकेट सुरू करण्याची पुढील दिशा ठरणार आहे.’

टॅग्स :बीसीसीआय