कुणालाच दोष देता येणार नाही - बुमराह

भारतीय गोलंदाजांच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील चमकदार कामगिरीचा फलंदाजांना फायदा घेता आला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 04:14 AM2020-03-02T04:14:27+5:302020-03-02T04:14:37+5:30

whatsapp join usJoin us
No one can be blamed - Bumrah | कुणालाच दोष देता येणार नाही - बुमराह

कुणालाच दोष देता येणार नाही - बुमराह

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय गोलंदाजांच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील चमकदार कामगिरीचा फलंदाजांना फायदा घेता आला नाही. पण प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मात्र यासाठी कुणाला दोषी ठरवू इच्छित नाही. बुमराह व मोहम्मद शमी यांनी एकूण सात बळी घेतले. त्यामुळे न्यूझीलंडचा पहिला डाव २३५ धावांत संपुष्टात आला.
आघाडीच्या फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीची पाठराखण करताना बुमराह म्हणाला,‘आम्ही कुणाला दोषी ठरवू इच्छित नाही. आम्ही कुणाला दोष देण्याचा प्रयत्न करीत नाही. एखाद्या दिवशी गोलंदाजांना बळी घेता आले नाही, तर फलंदाजांना आमच्याबाबत बोलण्याचा अधिकार नसतो.’ बुमराह पुढे म्हणाला, ‘मला रिषभ पंत व हनुमा विहारी यांच्या क्षमतेवर विश्वास आहे. ते प्रतिस्पर्धी संघापुढे तिसºया दिवशी अडचण निर्माण करू शकतात.’
बुमराह म्हणाला,‘एक संघ म्हणून आम्ही कडवी लढत देण्यास प्रयत्नशील आहोत. आम्ही चांगली कामगिरी करण्यास इच्छुक आहोत, पण परिस्थिती सर्वांना दिसतच आहे. आमचे दोन फलंदाज शिल्लक असून, आम्ही डाव लांबविण्यासाठी प्रयत्नशील असू. जास्तीत जास्त धावा फटकावण्याचा प्रयत्न आहे.’
हेगले ओव्हलच्या खेळपट्टीबाबत बुमराहने सांगितले,‘पहिल्या दिवशी खेळपट्टीवर मध्ये ओलावा होता. त्यामुळे त्यांनी गोलंदाजी केली. त्यावेळी काही ठसे उमटले. दोन्ही संघांना सीम मुव्हमेंट मिळत आहे. त्यामुळे अचूक टप्पा व दिशा राखून गोलंदाजी केल्यास प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याची संधी आहे. संघाला सात धावांची आघाडी मिळविता आल्यामुळे खूश आहे.’
वॅगनरचा झेल टिपल्याचे जाणवलेच नाही - जडेजा
स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने रविवारी न्यूझीलंडचा फलंदाज नील वॅगनरचा शानदार झेल टिपला. ‘चेंडू एवढ्या वेगात माझ्याकडे येईल, अशी मला आशा नव्हती,’ असे जडेजा म्हणाला. जडेजाने डीप मिडविकेटला उडी घेत वॅगनरचा (२१) झेल टिपला. त्यामुळे वॅगनर व जेमीसन (४९) यांची नवव्या गड्यासाठी झालेली ५१ धावांची भागीदारी संपुष्टात आली.
जडेजा म्हणाला,‘मला अपेक्षा होती की तो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने धावा वसूल करेल. पण चेंडू एवढ्या वेगाने माझ्याकडे येईल, हे अपेक्षित नव्हते. जोरा वाऱ्यांमुळे चेंडू वेगाने माझ्याकडे आला. ज्यावेळी मी हा झेल टिपला त्यावेळी मला वाटलेच नाही की हा झेल टिपला गेला. आम्ही चांगली गोलंदाजी केली. ’

Web Title: No one can be blamed - Bumrah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.