Join us  

के.एल राहुलसोबतच्या रिलेशनशीपबद्दल अभिनेत्रीने केला 'हा' खुलासा

दोघं एकत्र एका हॉटेलमध्ये डिनरला दिसल्याने अनेक चर्चांना उधाण आलं होतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 8:59 AM

Open in App

मुंबई-  मैदानावर अक्षरश: धावांचा धुमाकूळ घालणारा भारताचा आक्रमक फलंदाज के. एल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री निधी अग्रवाल एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती. दोघं एकत्र एका हॉटेलमध्ये डिनरला दिसल्याने अनेक चर्चांना उधाण आलं होतं. पण या प्रकरणावर आता स्वतः अभिनेत्री निधी अग्रवालने खुलासा केला आहे.

'मी आणि केएल राहुल खूप आधीपासून एकमेकांना ओळखतो. जेव्हा मी अभिनेत्री नव्हते व राहुलही क्रिकेटर नव्हता तेव्हापासून आमची ओळख आहे. आम्ही दोघं बंगळुरूच्या कॉलेजमध्ये एकत्र शिकलो नसलो तरीही आम्ही खूप आधीपासून एकमेकांना ओळखतो, असं स्पष्टीकरण स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीमध्ये निधी अग्रवालने म्हटलं आहे.

या आयपीएलच्या सत्रामध्ये केएल राहुलनेही किंग्ज इलेव्हन पंजाबकडून दमदार कामगिरी केली आहे. दुसरीकडे निधी अग्रवाल  काही दिवसांपूर्वीच मुन्ना मायकल या सिनेमात  दिसली होती. मात्र या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर कमाल करता आली नाही. मात्र या चित्रपटाने निधी अग्रवालला बरीच प्रसिद्धी मिळवून दिली. बंगळुरुची असणाऱ्या निधीने मॉडेलिंग केले असून मिस दिवा 2014 ची स्पर्धक होती.यंदाच्या लीगमध्ये सर्वाधिक स्फोटक सलामीवीर म्हणून राहुलने छाप पाडली. त्याचप्रमाणे तो सर्वात स्टायलिशही ठरला. स्पर्धेच्या दुसऱ्या सत्रामध्ये त्याने एकट्याच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबच्या प्लेआॅफ गाठण्याच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. क्षेत्ररक्षक आणि यष्टिरक्षक म्हणून तो लक्षवेधी ठरला. 

टॅग्स :लोकेश राहुल