पुढील IPL पाकिस्तानमध्ये होणार, उमर अकमलचं दिवास्वप्न; नेटकऱ्यांनी झोडपलं

पाकिस्तानचा क्रिकेटपटू उमर अकमल 18 महिन्यापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 07:52 PM2019-03-11T19:52:07+5:302019-03-11T19:52:30+5:30

whatsapp join usJoin us
Next IPL to be held in Pakistan, Umar Akmal gets roasted for MAJOR goof-up while promoting PSL - WATCH | पुढील IPL पाकिस्तानमध्ये होणार, उमर अकमलचं दिवास्वप्न; नेटकऱ्यांनी झोडपलं

पुढील IPL पाकिस्तानमध्ये होणार, उमर अकमलचं दिवास्वप्न; नेटकऱ्यांनी झोडपलं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कराची : पाकिस्तानचा क्रिकेटपटू उमर अकमल 18 महिन्यापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. पण, सोमवारी तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला. पाकिस्तान सुपर लीगचे ( PSL) प्रमोशन करताना अकमल अस काही म्हणाला की, नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच धारेवर धरले. क्युएत्ता ग्लॅडिएडरच्या सामन्याबद्दल बोलताना अकमलच्या तोंडून चुकून PSLच्या जागी IPL ( इंडियन प्रीमिअर लीग) असा उच्चार झाला.  

अकलमाने पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये पुढील आयपीएल पाकिस्तानमध्ये होईल असे वक्तव्य केले आहे. २० सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये अकमल म्हणतो, ‘आम्ही आमच्या घरच्या मैदानावर खेळत आहोत. यामुळे क्रिकेट चाहते आमच्या संघाला जेवढा पाठिंबा देतील तितकी चांगली कामगिरी संघ करेल. प्रेक्षकांनी अशाप्रकारे प्रत्येक संघाला पाठिंबा दिला तर पुढील आयपीएल पाकिस्तानमध्ये होईल.’ 

पाहा व्हिडीओ.. 


त्यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला...




Web Title: Next IPL to be held in Pakistan, Umar Akmal gets roasted for MAJOR goof-up while promoting PSL - WATCH

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.