Hashim Amla : दक्षिण आफ्रिकाचा दिग्गज हाशिम आमलाची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज हाशिम आमला याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 06:08 PM2023-01-18T18:08:52+5:302023-01-18T18:09:09+5:30

whatsapp join usJoin us
NEWS ALERT: Hashim Amla announces retirement from all forms of the game. | Hashim Amla : दक्षिण आफ्रिकाचा दिग्गज हाशिम आमलाची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती

Hashim Amla : दक्षिण आफ्रिकाचा दिग्गज हाशिम आमलाची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज हाशिम आमला याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. दोन दशकं त्याने क्रिकेटचे मैदान गाजवले आणि सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्याने एकूण ३४,१०४ धावा केल्या. ३९ वर्षीय आमलाने  १२४ कसोटींत २८  शतकं झळकावली आहेत, तर वन डे क्रिकेटमध्ये त्याच्या नाववर २७ शतकं आहेत. २०१२मध्ये त्याने  इंग्लंडविरुद्ध ३११ धावा चोपल्या होत्या आणि दक्षिण आफ्रिकेकडून त्रिशतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला होता. 

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये तो किंग्स इलेव्हन पंजाबचा सदस्य होता. याशिवाय त्याने स्थानिक क्रिकेटमध्ये Kwa-Zulu Natal, Dolphins आणि Cape Cobras संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. कौंटी क्रिकेटमध्ये तो  Derbyshire, Hampshire, Nottinghamshire आणि Essex आदी क्लबकडून खेळला.  

Web Title: NEWS ALERT: Hashim Amla announces retirement from all forms of the game.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.