- ललित झांबरे
कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत फलंदाजांनी शून्यापासून चारशे धावांपर्यंतच्या असंख्य खेळी केल्या आहेत. त्यात ०,१,२,३... ते १९८, १९९, २०० अशा प्रत्येक संख्येएवढ्या धावांची खेळी कोणत्या न् कोणत्या फलंदाजाने केलेलीच आहे. मात्र अशाही काही संख्या आहेत की त्या संख्येएवढ्या धावांची खेळी अद्याप कुणीच केलेली नाही.
हे आठवायचे कारण म्हणजे
न्यूझीलंडच्या टॉम लॅथमची सोमवारची श्रीलंकेविरुध्दची नाबाद २६४ धावांची खेळी. या खेळीचे वैशिष्ट्य हे की २६४ धावांची कसोटी खेळी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. यापूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये एकाही फलंदाजाने नेमक्या २६४ धावा केलेल्या नव्हत्या. त्यापेक्षा अधिक किंवा कमी धावा करणारे आहेत, पण नेमक्या २६४ धावा करणारा कुणीच नव्हता. अपवादच करायचा झाला तर रोहित शर्माच्या २६४ धावांचा करता येईल पण रोहितची ही खेळी वन डे सामन्यांतील होती, कसोटीतील नव्हती. योगायोगाने लॅथम व रोहित दोघांचीही २६४ धावांची खेळी श्रीलंकेविरुध्दच होती.
मात्र २६४ शिवाय कसोटी क्रिकेटमध्ये अजूनही काही संख्या आहेत ज्यांची खेळी आतापर्यंत एकाही फलंदाजाने केलेली नाही. कोणत्या आहेत ह्या संख्या ...तर जाणून घ्या..शून्य ते ३०० धावांदरम्यान अद्याप एवढ्या धावांची खेळी कुणीच केलेली नाही...
म्हणजे आता पुढे कसोटी सामन्यात कुणीही २२९ किंवा २५२ किंवा २९२ धावांची खेळी केली तर तेवढ्या धावा करणारा तो पहिलाच फलंदाज असेल.