Join us  

न्यूझीलंडला कमी धावसंख्येवर रोखणा-या गोलंदाजांनी रचला विजयाचा पाया : धवन

पुणे : दुस-या वन-डेत न्यूझीलंडला कमी धावसंख्येवर रोखणा-या गोलंदाजांना विजयाचे श्रेय देत विजयाचा खरा पाया गोलंदाजांनीच रचल्याचे सलामीवीर शिखर धवनचे मत आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 12:48 AM

Open in App

पुणे : दुस-या वन-डेत न्यूझीलंडला कमी धावसंख्येवर रोखणा-या गोलंदाजांना विजयाचे श्रेय देत विजयाचा खरा पाया गोलंदाजांनीच रचल्याचे सलामीवीर शिखर धवनचे मत आहे.भारताने काल रात्री न्यूझीलंडचा पराभव करीत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. निर्णायक सामना कानपूरमध्ये होणार आहे. धवनने ६८ आणि दिनेश कार्तिकने नाबाद ६४ धावा ठोकून चार षटके आधीच २३० धावांचे लक्ष्य गाठून दिले होते. सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना धवन म्हणाला, ‘सध्याच्या काळात २३० धावा अधिक वाटत नाहीत. गोलंदाजांनी हे काम केले. क्षेत्ररक्षकांचीही समर्थ साथ लाभल्यामुळे विजयाचा खरा पाया गोलंदाजांनीच रचला, असे म्हणावे लागेल. ३०० धावांचे लक्ष्य गाठण्याचे दडपण अधिक असते. त्यातुलनेत २३० धावांचे लक्ष्य गाठणे सोपे झाले, असेही त्याने नमूद केले.भारताने गोलंदाजी सुरू केली तेव्हा खेळपट्टीवर वेगवान चेंडू हवेत फिरत नव्हते, तरीही गोलंदाजांनी भेदक मारा करीत आमचे अर्धे काम सोपे केले. आम्ही प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा भक्कम सामना केला, शिवाय तुलनेत सरस फलंदाजीदेखील केली, असे श्खिर म्हणाला. शिखरने ४५ धावांत ३ गडी बाद करणाºया भुवनेश्वर कुमारची पाठ थोपटली. भुवनेश्वरने स्वत:चा मारा अधिक भेदक आणि शिस्तबद्ध केल्याचे सांगून धवन पुढे म्हणाला, ‘भुवी पूर्वीच्या तुलनेत अधिक उच्च दर्जाचा गोलंदाज वाटतो. चेंडूवरील त्याचे नियंत्रण वाखाणण्यासारखे आहे. मंद चेंडू टाकतो तेव्हादेखील अचूक टप्पा आणि दिशा राहील, याची काळजी घेतो.’ (वृत्तसंस्था)

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघशिखर धवन