Join us  

विश्व चॅम्पियनशिपआधी न्यूझीलंडचा मालिका विजय

कसोटी रँकिंगमध्ये न्यूझीलंड अव्वल  स्थानावर, भारताला टाकले मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 5:25 AM

Open in App

बर्मिंघम : न्यूझीलंडने दुसऱ्या आणि अंतिम क्रिकेट कसोटीत चौथ्या दिवशी इंग्लंडला आठ गड्यांनी पराभूत करत मालिकेत १-० विजय मिळ‌वला. त्यासोबतच न्यूझीलंडने कसोटी रँकिंगमध्ये भारताला अव्वल स्थानावरून हटवले. आता न्यूझीलंड पहिल्या तर भारत दुसऱ्या स्थानी आहे.

पहिल्या डावात ८५ धावांनी मागे पडलेल्या इंग्लंडचा संघ फक्त १२२ डावातच सर्वबाद झाला. संघाकडून नवव्या क्रमांकावर खेळणाऱ्या मार्क वुड याने सर्वाधिक २९ धावा केल्या. न्यूझीलंडकडून सामनावीर मॅट हेन्री आणि नील वॅगनर यांनी अनुक्रमे ३६ आणि १८ धावा देत प्रत्येकी तीन बळी घेतले. तर ट्रेंट बोल्ट आणि एजाज पटेल यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.न्यूझीलंडला ३८ धावांचे लक्ष्य मिळाले होते. हे लक्ष्य संघाने डेवोन कॉन्वॉय (३) आणि विल यंग (८) यांच्या बळींच्या मोबदल्यात पूर्ण केले.  कर्णधार टॉम लॅथम २३ धावा करून नाबाद राहिला या दोन्ही संघांमध्ये साऊथम्पटनमध्ये १८ जूनला विश्व कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जाणार आहे.   या विजयाने किवी संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे.n इंग्लंडच्या संघाने दुसऱ्या डावात  ९ गड्यांनी १२२ धावांवरून पुढे खेळण्यास उतरला. मात्र ट्रेंट बोल्टने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर ओली स्टोनला बाद करत यजमान संघाच्या डावाची अखेर केली. n लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने दुसऱ्या षटकातच कॉन्वॉय बाद झाला. त्याने स्टुअर्ट ब्रॉडने त्याला बाद केले. स्टोनने विल यंग याला त्रिफळाचीत केले. n लॅथम एका बाजुने टिकून राहिला. त्याने वुडला दोन चौकार लगावत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलकपहिला डाव -इंग्लंड सर्वबाद ३०३, न्यूझीलंड सर्वबाद ३८८.                    दुसरा डाव इंग्लंड सर्वबाद १२२, न्यूझीलंड (टॉम लॅथम नाबाद २३, डेवोन कॉनवे झे .ब्रासी गो. ब्रॉड ३,  विल यंग गो. स्टोन ८, रॉस टेलर नाबाद ०, अवांतर ७, एकूण २ बाद ४२ गोलंदाजी स्टुअर्ट ब्रॉड १/१३, ओली स्टोन १/५.) 

टॅग्स :न्यूझीलंड