Join us  

भारताला २३१ धावांचे माफक आव्हान, भुवनेश्वर-जसप्रीत बुमराचा भेदक मारा

भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमरा यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्युझीलंडला ५०षटकात ९ बाद २३० धावांवर रोखले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 2:00 PM

Open in App
ठळक मुद्देमहाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनचे पिच क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांच्यावर पिच फिक्सिंगचा आरोप झाला आहे.मागच्या सहा द्विपक्षीय मालिकांमध्ये विजय मिळवलेल्या भारतीय संघाला मायदेशी अशा परिस्थितीचा सामना फार कमी वेळा करावा लागतो.

पुणे -  भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमरा यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्युझीलंडला ५०षटकात ९ बाद २३० धावांवर रोखले. भुवनेश्वर कुमार याने १० षटकांत ४० धावा देत तीन तर जसप्रीत बुमरा याने दोन गडी बाद केले.

पीच फिक्सींगच्या सावटात सुरू झालेल्या या सामन्यात न्युझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्विकारली. मात्र हा निर्णय केन विल्यमसन आणि व्यवस्थापनाच्या चांगलाच अंगलट आला. बुमराच्या षटकांत चौकार ठोकत गुप्टीलने आपले इरादे स्पष्ट केले होते. तिसऱ्याच षटकांत मुनरोने भुवनेश्वर कुमारला षटकार लगावला. त्याच षटकात भुवनेश्वर कुमारने गुप्टीलला धोनीकरवी झेलबाद केले. त्यानंतर लगेचच भुवनेश्वरने कॉलीन मुन्रोला तंबूत परत पाठवले. 

वानखेडेवर शतक झळकावणारा रॉस टेलरला या सामन्यात  हार्दिक पांड्याने बाद केले. टेलरने ३३ चेंडूत २१ धावा केल्या. कुलदीप यादव ऐवजी संधी मिळालेल्या अक्षर पटेलने टॉम लॅमला पायचीत  पकडत संघासमोरचा मोठा धोका दूर सारला. लॅम आणि निकोल्स तसेच निकोल्स आणि ग्राण्डहोम यांनी उपयुक्त भागिदाऱ्या करत संघाला अडचणीतून बाहेर काढले. निकोल्स आणि ग्राण्डहोम यांनी ४७ धावांची भागिदारी केली. निकोल्सने ६२ चेंडूत ४२ धावा केल्या. तर मिशेल सेंटनर याने २९ धावांचे योगदान दिले.

४३ व्या षटकांत युजवेंद्र चहल याने सलग दोन चेंडूंवर ग्राण्ड होम आणि मिल्ने यांना बाद केले. डी ग्राण्डहोम याने ४० चेंडूतच ४१ धावा तडकावल्या. त्यावेळी संघाची धावसंख्या ८ बाद १८८ अशी होती. सेंटनर आणि साउदी यांनी फटकेबाजी करत संघाला २०० धावांचा टप्पा गाठून दिला. साऊदी याने २२ चेंडूत नाबाद २५ धावा केल्या.

धावफलकएकुण ५० षटकांत ९ बाद २३०मार्टिन गुप्तील झे.धोनी, गो. भुवनेश्वर कुमार ११, कॉलिन मुन्रोगो.भुवनेश्वर १०, केन विल्यमसन पायचीत बुमराह ३, रॉस टेलर झे.धोनी,गो.पांड्या २१, टॉम लॅ..म गो. अक्षर पटेल ३८, हेन्री निकोल्स गो.भुवनेश्वर कुमार ४२ कॉलीन डी ग्राण्डहोम झे. बुमरा गो. चहल ४१, मिशेलसेंटनर झे. कोहली गो. बुमराह २९, अॅडम मिल्ने पायची चहल ०, टीम साउदीनाबाद २५, ट्रेंट बोल्ट नाबाद २गोलंदाजी – भुवनेश्वर कुमार १०-०-४५-३, जसप्रीत बुमरा १० २-३८-२, केदार जाधव ८-०३१-०, हादिर्क पांड्या ४-०-२३-१, अक्षर पटेल १०-१-५४-१, चहल ८-१-३६-२.

टॅग्स :क्रिकेट