Join us  

बोल्टच्या हॅट्ट्रिकमुळे न्यूझीलंडची सरशी

ट्रेंट बोल्टने वन डे क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक नोंदविणारा तिसरा गोलंदाज होण्याचा मान मिळविला, त्याचवेळी बुधवारी झालेल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानवर ४७ धावांनी विजय नोंदवित न्यूझीलंडला मालिकेत १-० ने आघाडीदेखील मिळवून दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2018 2:03 AM

Open in App

अबुधाबी : ट्रेंट बोल्टने वन डे क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक नोंदविणारा तिसरा गोलंदाज होण्याचा मान मिळविला, त्याचवेळी बुधवारी झालेल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानवर ४७ धावांनी विजय नोंदवित न्यूझीलंडला मालिकेत १-० ने आघाडीदेखील मिळवून दिली.पाकला २६७ धावांचे लक्ष्य मिळाले होते. वेगवान गोलंदाज बोल्टने फटर जमा(१), बाबर आझम(००)आणि मोहम्मद हफीज(००) यांना बाद करीत ३ बाद ८ अशी अवस्था केली. या धक्क्यातून अखेरपर्यंत न सावरणाऱ्या पाकने ४७.२ षटकांत २१९ धावांत नांगी टाकली. बोल्टने ५४ धावांत तीन गडी बाद केले.त्याआधी, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. अनुभवी रॉस टेलर(८०)आणि टॉम लॅथम(६८) यांच्या अर्धशकांच्या बळावर ८ बाद २६६ पर्यंत मजल गाठली.

टॅग्स :न्यूझीलंडपाकिस्तान