Join us  

तुम्हाला माहित्येय का; रॉस टेलर जीभ दाखवून शतकाचं सेलिब्रेशन का करतो ?

न्यूझीलंडच्या रॉस टेलरनं वन डे मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या विजयावर पाणी फिरवले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2020 7:23 PM

Open in App

न्यूझीलंडच्या रॉस टेलरनं वन डे मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या विजयावर पाणी फिरवले. टेलरनं आपल्या अनुभवाच्या जोरावर 348 धावांचं तगडं लक्ष्यही सहज करून दिले. त्यानं नाबाद शतकी खेळी करताना न्यूझीलंडला तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. रॉसनं पहिल्या वन डे सामन्यात 84 चेंडूंत 10 चौकार व 4 षटकार खेचून नाबाद 109 धावा केल्या. त्याला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले. पण, त्याच्या या सामन्यातील जीभ दाखवण्याच्या सेलिब्रेशनची चर्चा सोशल मीडियावर रंगली. 

न्यूझीलंडने पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचे कडवे आव्हान 4 विकेट्स राखून परतवले आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने 50 षटकांत 4 बाद 347 धावांचा एव्हरेस्ट उभारल्यानंतर यजमानांनी शांतपणे खेळ करताना 48.1 षटकांतच 6 बाद 348 धावा करुन बाजी मारली. अनुभवी फलंदाज रॉस टेलर नाबाद 109 धावा करुन सामनावीर ठरला. या सामन्यात भारताकडून श्रेयस अय्यर ( 103),  लोकेश राहुल ( नाबाद 88) आणि विराट कोहली ( 51) यांनी दमदार खेळी केली होती. त्याला न्यूझीलंडच्या रॉस टेलर ( नाबाद 109), हेन्री निकोल्स ( 78) आणि टॉम लॅथम ( 69) यांनी तोडीत तोड उत्तर दिले. 

रॉसचं सेलिब्रेशन नेहमीच चर्चेत राहिलं आहे. पण, टीम इंडियाचा फिरकीपटू हरभजन सिंगनं त्याच्या खेळीचं कौतुक करताना, जीभ दाखवण्याच्या सेलिब्रेशन मागचं कारण विचारलं होतं. त्यावर आम्ही उत्तर शोधून काढलं आहे. 2019च्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात शतक झळकावल्यानंतर रॉसनं या सेलिब्रेशनमागचं रहस्य सांगितलं होतं. ''माझं जीभ काढणं माझ्या मुलीला खूप आवडतं. त्यामुळे हे सेलिब्रेशन तिच्यासाठी आहे, असं म्हटलं तरी हरकत नाही.'' 2007 पहिल्यांदा शतकी खेळी केल्यानंतर टेलरनं असं सेलिब्रेशन केलं होतं. त्यानंतर प्रत्येक शतकानंतर त्यानं जीभ दाखवण्याची परंपरा कायम राखली आहे.  

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडरॉस टेलर