Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारत दौ-यासाठी न्यूझीलंड संघ जाहीर; अष्टपैलू नीशामला स्थान नाही

न्यूझीलंडने भारताविरुद्ध पुढील महिन्यात खेळल्या जाणा-या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी नऊ सदस्यांचा कोअर संघ जाहीर केला असून त्यात अष्टपैलू जिमी नीशामला स्थान मिळालेले नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 02:51 IST

Open in App

ख्राईस्टचर्च : न्यूझीलंडने भारताविरुद्ध पुढील महिन्यात खेळल्या जाणा-या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी नऊ सदस्यांचा कोअर संघ जाहीर केला असून त्यात अष्टपैलू जिमी नीशामला स्थान मिळालेले नाही. संघातील अन्य सहा खेळाडू न्यूझीलंड ‘अ’ संघातून निवडण्यात येणार आहे. न्यूझीलंड ‘अ’ संघ सध्या भारत दौ-यावर आहे.जून महिन्यात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरलेला नीशाम व फलंदाज नील ब्रुम यांना संघातून वगळण्यात आले.प्रशिक्षक माईक हेसन म्हणाले,‘ज्या नऊ खेळाडूंची आम्ही निवड केली ते खेळाडू गेल्या काही कालावधीपासून आमच्या वन-डे आंतरराष्ट्रीय संघाचे महत्त्वाचे सदस्य आहेत. सर्वांना भारतात खेळण्याचा अनुभव आहे. आमचे आघाडीचे काही खेळाडू यापूर्वीच भारतात खेळत आहेत. त्यामुळे संघाची दोन टप्प्यात निवड सहायक ठरणार आहे. संघातील सहा स्थान रिक्त असून न्यूझीलंड ‘अ’ संघातील खेळाडूंना चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल.’ (वृत्तसंस्था)भारत दौºयासाठी निवड झालेले न्यूझीलंड संघातील नऊ खेळाडू :- केन विलियम्सन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, कोनि डि ग्रँडहोम, मार्टिन गुप्टिल, टॉम लॅथम, अ‍ॅडम मिल्ने, मिशेल सँटनर, टीम साऊदी आणि रॉस टेलर.

टॅग्स :क्रिकेट