Join us  

IPL मधील दोन नव्या संघासाठी १७ ऑक्टोबरला ऑक्शन; संजिव गोएंका खरेदी करणार 'ही' फ्रँचायझी!

इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वात ( IPL 2022) दोन नव्या संघांचा समावेश होणार आणि त्यासाठीची अर्ज करण्याची मुदत संपली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 2:52 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वात ( IPL 2022) दोन नव्या संघांचा समावेश होणार आणि त्यासाठीची अर्ज करण्याची मुदत संपली आहे. आता हे दोन नवे संघ कोणते असतील याची उत्सुकता लागली आहे आणि १७ ऑक्टोबरला बीसीसीआय त्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. Cricbuzzनं दिलेल्या वृत्तानुसार आयपीएल २०२१च्या अंतिम सामन्यानंतर दुबईत याची घोषणा होण्याची शक्यता आले. मस्कत किंवा दुबईत दोन नव्या संघासाठी ऑक्शन होईल.

Cricbuzzनं दिलेल्या वृत्तानुसार तीन टप्प्यांत दोन संघांसाठीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. २१ सप्टेंबरला नवीन संघांसाठी आलेल्या अर्जांची छाननी केली जाईल. ५ ऑक्टोबरपर्यंत डॉक्युमेंट सादर केले जातील आणि १७ ऑक्टोबरला ऑक्शन होईल. दोन नवीन संघांच्या समावेशानंतर प्रत्येक संघाच्या वाट्याला १४ किंवा १८ सामने येतील. पण, आयपीएलसाठीचा कालावधी लक्षात घेता दहा संघांची दोन गटात विभागणी करून सामने खेळवण्यात येतील. नव्या संघासाठी बीसीसीआयनं ज्या कंपनीचे टर्नओव्हर ३००० कोटी आहे, त्यांनाच बोली लावण्याची अट ठेवली आहे. तसेच नव्या संघाची प्रत्येकी किंमत ही २ ते २.५ हजार कोटी असेल.

दोन नव्या संघांसाठी अहमदाबाद, लखनौ, इंदौर, कटक, गुवाहाटी आणि धर्मशाला या शहरांमध्ये चुरस असेल आणि सर्वाधिक बोली लावणारा जिंकेल. दोन नवीन संघांच्या समावेशामुळे पुन्हा खेळाडूंचा लिलाव होईल आणि सूत्रांच्या माहितीनुसार आता खेळत असलेल्या ८ फ्रँचायझींना प्रत्येकी दोन खेळाडू कायम राखता येतील, तर दोन खेळाडू RTM नुसार संघात राखता येतील. नोव्हेंबरमध्ये याबाबतची अधिकृत घोषणा केली जाईल आणि जानेवारी २०२२मध्ये खेळाडूंचे ऑक्शन होईल. संजिव गोएंका हे लखनौ टीम खरेदी करण्यासाठी उत्सुक आहेत.

टॅग्स :आयपीएल २०२१बीसीसीआय
Open in App