Join us  

Video : लेफ्टी की रायटी?; फलंदाजानं लढवली अशी शक्कल की गोलंदाज, क्षेत्ररक्षक हैराण; बघा पुढे काय झालं

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, हे उगाच म्हटले जात नाही. पण, कधी कधी या खेळात मजेशीर किस्सेही घडलेले पाहायला मिळतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 1:27 PM

Open in App

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, हे उगाच म्हटले जात नाही. पण, कधी कधी या खेळात मजेशीर किस्सेही घडलेले पाहायला मिळतात. MCA T20 Clubs Invitation स्पर्धेच्या ८व्या सामन्यात असाच एक मजेशीर किस्सा घडला आणि सोशल मीडियावर त्याचीच चर्चा आहे. KL Stars vs Royal Warriors या दोन संघामध्ये सामन्यातील हा किस्सा आहे.

वॉरियर्स संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि त्यांचा सलामीवीर सय्यद अझीज लगेच माघारी परतला. १ बाद १६ अशी धावसंख्या असताना यष्टिरक्षक-फलंदाज हरिंदरजीत सिंग सेखॉन फलंदाजीला आहे. हरिंदरजीत गार्ड घेत असताना, स्टार्सचा गोलंदाज संतोष याने क्षेत्ररक्षणात बदल करण्याचा निर्णय घेतला आणि त्याने दोन खेळाडूंना ऑफ साईडला येण्यास सांगितले. हरिंदरजीत डावखुरा फलंदाज आहे असे त्याला वाटले. 

पण, त्यानंतर फलंदाजानं पोझिशन बदलली आणि तो राईट हँडने फलंदाजीसाटी उभा राहिला. त्यानंतर गोलंदाज व क्षेत्ररक्षण सारेच चकित झाले आणि पुन्हा क्षेत्ररक्षणात बदल करण्याचा इशारा संतोषने दिला. हा व्हिडीओ स्वतः त्या फलंदाजाने पोस्ट केला आहे.  

हरिंदरजीतने या सामन्यात ४८ चेंडूंत ५६ धावा केल्या. कृष्णा वर्माने ३३ धावांचे योगदान देत वॉरियर्सला २० षटकांत ७ बाद  १२५ धावांपर्यंत पोहोचलवले. स्टार्सच्या हाफिज शाहिदने २० धावांत ४ विकेट्स घेतल्या. स्टार्सचा संपूर्ण संघ ७४ धावांवर गडगडला. ११ पैकी ६ फलंदाजांना धावही करता आली नाही.   

टॅग्स :सोशल व्हायरल
Open in App